चालताना गुडघ्यांमधून सतत कटकट आवाज येतो? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा
वय वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मात्र हल्ली बिघडलेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच गुडघ्यांमधील वेदना, हाडे दुखणे, सांधे दुखणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी डान्स वर्कआउट्स, हाय-इंटेन्सिटी ट्रेनिंग तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. मात्र तरीसुद्धा हाडांच्या वेदना कमी होत नाहीत. गुडघे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर खाली बसताना आणि वर उठताना हाडांमधून कटकट आवाज येतो. याशिवाय हाडे दुखी लागतात. अनेक लोक गुडघे किंवा हाडांच्या वेदना वाढू लागल्यानंतर मेडिकलमधील पेनकिलरचे सेवन करतात. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे गुडघे दुखीच्या वेदनांपासून आराम मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गुडघे दुखी, सांधे दुखी इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सांध्यांवर वाढलेल्या तणावामुळे वेदना वाढू लागतात. चालताना गुडघ्यांच्या पुढील भागावर तणाव येतो, ज्यामुळे वेदना वाढू लागतात. त्यामुळे तुम्ही रेट्रो वॉकिंग करून गुडघ्यांवर वाढलेला तणाव कमी करू शकता. यामुळे वेदना इतर भागावर पसरू लागतात. रेट्रो वॉकिंग केल्यामुळे वेदना कमी होतात आणि हालचाली सुलभ होण्यास मदत होते.
वजन वाढल्यानंतर शरीराचा संपूर्ण भार गुडघ्यांवर येतो, ज्यामुळे वारंवार गुडघे दुखी किंवा सांध्यांमध्ये वेदना वाढू लागतात. रेट्रो वॉकिंग करताना शरीर आणि मेंदूमध्ये नवनवीन हालचाली होण्यास मदत होते. याशिवाय न्यूरोमस्क्युलर मार्ग सक्रिय होतो आणि शरीराचे संतुलन सुधारते. शरीराचे पोश्चर योग्य कायमच योग्य ठेवण्यासाठी नियमित चालणे किंवा हालचाली करणे आवश्यक आहे. शरीराच्या हालचालींमध्ये बिघाड झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे कायमच शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे.
सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय व्यायाम करताना नेहमी सपाट पृष्ठभागावर आणि फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली करावा. यामुळे हाडांसंबंधित वेदनांपासून आराम मिळेल. नियमित रेट्रो वॉकिंग केल्यामुळे गुडघ्यांच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर नियमित रेट्रो वॉकिंग करणे आवश्यक आहे.
गुडघेदुखीची लक्षणे कोणती?
गुडघ्यात वेदना आणि सूज, गुडघा वाकवण्यास किंवा सरळ करण्यास त्रास, गुडघ्यातून आवाज येणे (पॉपिंग किंवा क्रॅकिंग), गुडघा अस्थिर वाटणे, गुडघ्याच्या आजूबाजूला लालसरपणा आणि उष्णता.
गुडघेदुखी टाळण्यासाठी काय करावे?
वजन नियंत्रणात ठेवा.नियमित व्यायाम करा, विशेषत: गुडघे मजबूत करणारे व्यायाम.योग्य शूज घाला.खेळताना किंवा शारीरिक कष्टाची कामे करताना योग्य तंत्राचा वापर करा.गुडघ्याला विश्रांती द्या.
गुडघेदुखीसाठी काही सोपे व्यायाम कोणते?
जमिनीवर झोपून एक पाय वाकवून दुसरा पाय सरळ ठेवा आणि हळू हळू वर उचला.भिंतीला टेकून बसा आणि गुडघे वाकवून स्क्वॅट करा. खुर्चीवर बसून एक पाय पुढे सरळ करा आणि पायाचा पंजा वरच्या दिशेने ताणा.