वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
कोलेस्टेरॉल ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे ज्याचा अनेक लोक त्रास घेत आहेत. हा पिवळा कचरा रक्तवाहिन्या ब्लॉक करतो, ज्यामुळे हृदय आणि स्ट्रोकसह अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. अनेक लोकांना कधीकधी कोलेस्टेरॉल औषधांवर अवलंबून राहावे लागते. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करायचे असेल तर तुम्ही तुमचा आहार बदलला पाहिजे.
हार्वर्ड हेल्थने दिलेल्या अहवालानुसार, जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य बदल केले तर कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. रक्तातील ही अशुद्धता काढून टाकण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात फायबर, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, स्टेरॉल आणि स्टॅनॉल सारख्या घटकांनी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत. विरघळणारे फायबर पचनसंस्थेतील कोलेस्टेरॉलला बांधते आणि ते बाहेर काढते, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स थेट एलडीएल कमी करतात आणि स्टेरॉल आणि स्टॅनॉलसारखे घटक शरीराला कोलेस्टेरॉल शोषण्यापासून रोखतात
ओट्स
ओट्ससारख्या पदार्थाचा करा समावेश
नाश्त्यात ओटमील किंवा ओटचे धान्य खाल्ल्याने १-२ ग्रॅम विरघळणारे फायबर मिळते. केळी किंवा स्ट्रॉबेरी घातल्याने ०.५ ग्रॅम जास्त मिळू शकते. दररोज ५-१० ग्रॅम विरघळणारे फायबर घेणे फायदेशीर आहे. ओट्सप्रमाणे, बार्ली अर्थात जवस आणि संपूर्ण धान्ये हृदयरोगाचा धोका कमी करतात. हे दोन्ही पदार्थ तुमचे हार्ट चांगले राखण्यास मदत करतात.
बीन्स, वांगं आणि भेंडीची भाजी
आहारामध्ये करून घ्या समावेश
बीन्समध्ये विरघळणारे फायबर जास्त असते आणि ते हळूहळू पचतात, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि सतत भूक लागत नाही. नेव्ही बीन्स, राजमा, मसूर, चणे, काळे वाटाणे इत्यादी चांगले पर्याय आहेत. त्याचप्रमाणे, वांगी आणि भेंडी सारख्या कमी कॅलरी असलेल्या भाज्या विरघळणारे फायबरचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करून घ्यावा.
नट्स आणि वनस्पती तेल, आंबट फळं
फळांचा आणि नट्सचा करून घ्या वापर
बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि इतर काजू असे पदार्थ हृदयासाठी चांगले असतात. दररोज दोन औंस नट्स खाल्ल्याने LDL सुमारे 5% कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे, लोणी किंवा तुपाऐवजी कॅनोला, सूर्यफूल सारख्या द्रव तेलांचा वापर केल्याने LDL कमी होते. चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा वापर करून घेऊ शकता. याशिवाय संत्रं, द्राक्षे, स्ट्रॉबेरीसारखी आंबट फळेदेखील उपयुक्त ठरतात कारण यामध्ये पॅक्टिन नावाचे विरघळणारे फायबर आढळते, जे LDL कमी करते.
शरीरामध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत प्रभावी
सोया उत्पादने आणि फायबर सप्लीमेंट, फॅटी फिश
आहारात मासे आणि सोया खावेत
टोफू, सोया दूध आणि इतर सोया उत्पादने एलडीएल ५-६% कमी करू शकतात. त्याचप्रमाणे, सायलियम सारख्या फायबर सप्लिमेंट्समुळे दररोज ४ ग्रॅम पर्यंत विरघळणारे फायबर मिळू शकते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये वा नाश्त्यामध्ये या पदार्थांचा नियमित वापर करून घेतला पाहिजे आणि आठवड्यातून १-२ वेळा हे पदार्थ नियमितपणे खावेत.
याशिवाय आठवड्यातून तुम्ही २-३ वेळा मासेदेखील खावेत कारण मासे खाण्यामुळे तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल विरघळून जाते आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते.