झुरळांच्या शरीरावर वाढणाऱ्या 'या' जीवाणूमुळे शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच घरात झुरळ पाहिल्यानंतर मोठ्या मोठ्या ओरडू लागतात.किळसवाणे झुरळ घरात आल्यानंतर सगळ्यांचं घाण वाटते. घराच्या आजूबाजूला किंवा घाणीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झुरळ असतात. हेच झुरळ घरात शिरून अन्नपदार्थांचे नुकसान करतात. बऱ्याचदा झुरळ अंधाऱ्या ठिकाणी, किचनमधील कोपऱ्यात, माळ्यावर, अडगळीच्या खोलीमध्ये किंवा भांड्यावर फिरताना दिसतात. पण झुरळांच्या अंगावर असलेले घाणेरडे आणि जीवघेणे विषाणू शरीरासाठी अतिशय घातक आहेत. शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढू लागतो. घरात आलेले झुरळ कमी करण्यासाठी सतत काहींना काही केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात झुरळांची पैदास झाल्यास सगळीकडे झुरळ फिरू लागतात. झुरळांच्या शरीरावर साल्मोनेला आणि ई. कोलाय नावाचे हानिकारक विषाणू असतात. हे विषाणू अन्नपदार्थांमधून किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीरात गेल्यामुळे ताप, अतिसार, पोटदुखी, उलट्या आणि डिहायड्रेशन इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. झुरळांच्या शरीरावरील गंभीर विषाणू रक्तात मिक्स झाल्यानंतर सेप्सिस सारख्या गंभीर आजरांची शरीराला लागण होते. रक्तात विषाणू मिक्स झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती उलटी प्रतिक्रिया देते, ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे आणि अवयवांचे गंभीर नुकसान होते. तसेच यामुळे सेप्टिक शॉक, अवयव निकामी होऊन मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते.
झुरळ अन्नपदार्थांमध्ये फिरल्यानंतर ई. कोलाय जीवाणू शरीरात प्रवेश करतो. पाण्यातून हा विषाणू शरीरात गेल्यानंतर आतड्यांचे गंभीर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय अतिसार होणे, रक्तातील इन्फेक्शन किंवा हेमोलिटिक यूरेमिक सिंड्रोम होऊ शकतो. तसेच किडनीवर परिणाम झाल्यानंतर दोन्ही किडनी निकामी होऊन जातात. हा विषाणू प्रामुख्याने लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. ई. कोलाय विषाणू मानवी शरीरातील लाल रक्त पेशी कायमच्या नष्ट करणे, रक्तातील इन्फेक्शन वाढवणे किंवा किडनीच्या आरोग्यावर परिणाम करतो. किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होतात.
जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? ‘या’ सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम
किचनवर किंवा इतर ठिकाणी झुरळांची विष्ठा, लाळ आणि मृत शरीराचे भाग इत्यादी अनेक गोष्टी तशाच पडून राहतात. यामुळे अस्थमासारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे झुरळांपासून बचाव करण्यासाठी घरातील भांडी किंवा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. उघड्यावर ठेवलेली भांडी स्वच्छ पाण्याने धुवून नंतरच वापर करावा. याशिवाय फर्निचर केलेल्या घरात झुरळ होऊ नये म्हणून महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्या.