
पोटात कायमच जडपणा जाणवतो? पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
पोटाच्या कॅन्सरची लक्षणे?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
पोटाचा कॅन्सर होण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात?
बदलेली जीवनशैली, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अल्कोहोलचे सेवन आणि आरोग्यासंबंधित इतर समस्यांमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. मागील वर्षभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यातील अतिशय घातक कॅन्सर म्हणजे पोटाचा कॅन्सर. वारंवार लाल मांस किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केल्यामुळे आतड्यांचे संतुलन बिघडून जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
एका दिवसात किती वेळा बिअरचे सेवन करावे? बिअरची नशा किती तास टिकून राहते? जाणून घ्या सविस्तर माहिती
पोटाचा कॅन्सर होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. पोटाच्या आतील अस्तरात असणाऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यामुळे पोटाची आतली भिंत बदलू लागते, ज्यामुळे अन्न पचन, रक्तपुरवठा आणि इतर अवयवांच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. गॅस्ट्रिक कॅन्सर हा जगातील सगळ्यात घातक कॅन्सर आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची लागण होते, पण हल्ली कोणत्याही वयातील व्यक्तींना कॅन्सर होण्याची होण्याची शक्यता असते.
पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने शरीरातील लक्षणांमध्ये वाढ होते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडते. पोटदुखी, जेवणानंतर जडपणा, अपचन, सतत गॅस, पोटात अस्वस्थता किंवा वारंवार मळमळ जाणवू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. कॅन्सरच्या लक्षणांमध्ये वाढ झाल्यानंतर अचानक वजन कमी होणे, शरीराच्या कोणत्याही अवयवांमधून रक्त येणे, मलाचा रंग बदलणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पोटाचा कॅन्सर होण्यामागे जीवनशैलीत अनेक गोष्टी परिणाम करतात. प्रक्रिया केलेली, खारट, स्मोक्ड किंवा संरक्षित अन्न, जास्त मीठ, भाज्या कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय लठ्ठपणा, कमी प्रमाणात पाण्याचे सेवन, पोषक घटकांचा अभाव, चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते.
Ans: पोटाचा कर्करोग हा पोटाच्या आतील अस्तरामध्ये सुरू होणारा कर्करोग आहे. असामान्य पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे ट्यूमर तयार होतो.
Ans: खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे
Ans: पोटाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असणे, हे एक कारण असू शकते.