हिवाळ्यात शरीराची कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कोणते पदार्थ खावेत ?
थंडीत रक्तवाहिन्यांना इजा का पोहचते?
ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात शरीराच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय वेगवेगळ्या साथीच्या आजारांमुळे सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांची लागण होते. साथीचे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. या दिवसांमध्ये वातावरणात वाढलेल्या गारव्याचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडणे, डिहायड्रेशन आणि इतरही समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. यामुळे हृदय आणि फुफ्फुसावर याचा वाईट परिणाम होतो. त्यातच हवेतील विषारी प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात ऑक्सिजनची कमतरता असल्याने शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास प्रथम ओठांचा रंग बदलतो. छातीत अचानक दुखू लागणे, सतत खोकला येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे जर ही लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील तर ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या टिप्स अवश्य फॉलो करा.हिवाळ्यात विविध आजार बळावतात. त्यातच सण समारंभानिमित्ताने लोकांचे एकत्र येण्याचे प्रमाण वाढते, यामुळे हवेतील विषाणू तसेच बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक विकारांना निमंत्रण मिळते, असे तज्ज्ञ सांगतात.
शरीरातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी दररोज पुरेसे पाणी प्यावे असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. यासाठी दररोज किमान 3 लिटर पाणी प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचतो.
पौष्टिक खजूरचे सेवन:
खजूर आरोग्यासाठी औषधाप्रमाणे काम करतो. त्यात सेलेनियम, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. याच्या सेवनाने शरीरातील ऑक्सिजनची कमतरता दूर होते.
श्वासोच्छवासाचे व्यायाम करा:
शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी कॉर्ड ब्रीदिंग एक्सरसाइज दररोज करा. हा व्यायाम बसूनही करता येतो. त्यामुळे कोणीही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतो. हा व्यायाम केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त, श्वसन प्रणाली मजबूत होते. याशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळीही वाढते.
ताडासन करा:
ताडासन केल्याने श्वसन प्रक्रिया सुधारते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. यामुळे शरीराची मुद्राही सुधारते. फुफ्फुसाचा वरचा भाग सक्रिय करण्यास देखील मदत करते. डॉक्टर अस्थमाच्या रुग्णांना ताडासन करण्याचा सल्ला देतात.






