एका दिवसात किती वेळा बिअरचे सेवन करावे? बिअरची नशा किती तास टिकून राहते?
बिअरचे सेवन केल्यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते?
बिअरची नशा कितीवेळ टिकून राहते?
जास्त प्रमाणात बिअर प्यायल्यास कोणते नुकसान होते?
भारतासह जगभरात सगळीकडे बिअर पिणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. विकेंडला बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा इतर वेळी पार्टी, घरातील कार्यक्रमांमध्ये बिअर आणि दारूचे सेवन केले जाते. याशिवाय काहींना रोजच बिअर आणि दारू पिण्याची सवय असते. बिअरच्या सेवनाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. बिअर दारुपेक्षा अतिशय सौम्य असते. तरुण वयातील मुलामुलींपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळेच बिअरचे सेवन करतात. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण अतिशय कमी असते. पण सतत बिअर पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. अनेक लोक दिवसभरात ५ ते ६ बॉटल बिअर पितात. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका दिवसात किती वेळा बिअरचे सेवन करावे? बिअरची नशा किती तास टिकून राहते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीतील बदल आणि तरुण वयात मजा मस्ती करण्यासाठी लहान मुलंसुद्धा बिअर पितात. दीर्घकाळ निरोगी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही महिन्यातून २ किंवा ४ वेळा बिअरचे सेवन करू शकता. मात्र या प्रमाणापेक्षा जास्त बिअरचे सेवन केल्यास लिव्हर आणि पोटासंबंधित आजारांची लागण होऊ शकते. पुरुषांनी दिवसभरात 650 मिली म्हणजे २ ग्लासांपेक्षा जास्त प्रमाणात बिअरचे सेवन करू नये. तर महिलांनी दिवसभरात 330 मिली म्हणजे अंदाजे 1 ग्लासापेक्षा जास्त बिअर पिऊ नये. वारंवार बिअरचे सेवन केल्यास वजन वाढण्यासोबतच झोपेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते.
एक बॉटल बिअरचे सेवन केल्यास २ ते ३ तासांपर्यंत नशा टिकून राहते. मात्र बिअरची नशा शरीराचे वजन किती आहे? बिअर रिकाम्या पोटी घेतली की अन्नासोबत? इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी अजिबात बिअरचे सेवन करू नये. यामुळे महिलांच्या आरोग्याला हानी पोहचते. तसेच लिव्हर, हृदयरोग आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी बिअर पिऊ नये. रिकाम्या पोटी बिअरचे अजिबात सेवन करू नये. यामुळे जास्त नशा चढते.
हलकी आणि कमी कॅलरीज असलेली बिअर शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण अतिशय कमी असते. कमी अल्कोहोल असलेल्या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीराचे नुकसान कमी प्रमाणात होते. कोणत्याही ऋतूंमध्ये तुम्ही बिअरचे सेवन करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बिअर प्यायल्यास शरीरात थंडावा निर्माण होतो.
Ans: अल्कोहोल व्यसन लावणारे आणि आरोग्याला हानिकारक आहे.
Ans: नाही, सोशल मीडियावर असा दावा केला जातो, पण तो चुकीचा आहे.
Ans: बिअरची बाटली खरेदी करण्यापूर्वी त्यावरची ‘एक्सपायरी डेट’ नक्की तपासा, कारण ती खराब होऊ शकते.






