उन्हाळ्यात अंगाला सतत खाज येते? 'हे' घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम
मे महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे कडक ऊन पडण्यास सुरुवात होते. कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर संपूर्ण शरीर लाल होऊन जाते. याशिवाय त्वचेवर फोड येणे, त्वचा तेलकट होणे किंवा चेहऱ्यावर इतर समस्या दिसू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे अंगावर घामोळं येणे. अंगावर घामोळं आल्यानंतर अंगावर सतत खाज येऊ लागते. वाढत्या गर्मीमध्ये त्वचा तेलकट आणि चिकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)
अंगावर घामोळं आल्यानंतर सतत खाज येणे, त्वचा लाल होणे किंवा त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. घामोळं आल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पावडर अंगावर लावल्या जातात. मात्र बऱ्याचदा या पावडरमुळे त्वचेची नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंगावर वाढलेलं घामोळं कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागेल.
शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी अतिशय गुणकारी आहे. एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात काकडीचे तुकडे टाकून घामोळं आलेल्या ठिकाणी लावून घ्या. काकडी घामोळ्यांवर चोळल्यामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेपासून आराम मिळेल आणि घामोळं कमी होईल.
नाजूक डोळ्यांखाली चुकूनही लावू नका ‘हे’ ब्युटी प्रॉडक्ट, डोळ्यांचे होईल कायमचे गंभीर नुकसान
धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीची पाने सुकवून त्यांची पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेल्या पावडरमध्ये थोडस पाणी घालून संपूर्ण घामोळ्यांवर तुळशीची पावडर लावून घ्या.