नाजूक डोळ्यांखाली चुकूनही लावू नका 'हे' ब्युटी प्रॉडक्ट
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे डोळे. संपूर्ण शरीराचे सौंदर्यात भर पाडण्यासाठी डोळे अतिशय महत्वाचे आहेत. मेकअप कराताना डोळ्यांवर काजळ, मस्कारा, आयलायनर इत्यादी गोष्टी लावल्या जातात. ज्यामुळे डोळे अधिक उठावदार आणि सुंदर दिसू लागतात. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचे सौंदर्य खराब होऊन जाते. चेहरा आणि संपूर्ण शरीराच्या त्वचेपेक्षा डोळ्यांखाली त्वचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक असते. त्यामुळे डोळ्यांखाली कोणत्याही क्रीम किंवा लोशनचा वापर करू नये. केमिकलयुक्त मेकअप प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे डोळ्यांखाली मुरूम येणे, काळे डाग येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
ना राहणार पिंपल्स, ना राहतील डाग; उन्हाळ्यात झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर लावा ‘हा’ तेल
डोळे अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे डोळ्यांखाली कोणतेही प्रॉडक्ट लावताना किंवा क्रीम लावताना अतिशय विचारपूर्वक आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने लावावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची काळजी घेतात कोणत्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर डोळ्यांसाठी करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे प्रॉडक्ट डोळ्यांखाली लावल्यास डोळ्यांचे गंभीर नुकसान होऊन डोळे खराब आणि विचित्र दिसू लागतील. केमिकलयुक्त ब्युटी प्रॉडक्ट डोळ्यांचे सौंदर्य खराब करून टाकतात.
डोळ्यांखाली कोणत्याही फेस क्रीमचा वापर करू नये. फेसक्रीमच्या वापरामुळे डोळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे डोळे किंवा डोळ्यांच्या खालील त्वचा लाल होऊ शकते. चेहऱ्यावर लावल्या जाणाऱ्या क्रीम्समध्ये अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. त्यामुळे डोळ्यांखाली क्रीम लावू नये. डोळ्यांखाली क्रीम लावल्यानंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे, सूज येणे किंवा इतरही समस्या उद्भवू शकतात.
त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी महिला फेसस्क्रबचा वापर करतात. फेसस्क्रब वापरल्यामुळे त्वचा अतिशय कोरडी होऊन जाते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. त्वचेमधील ओलावा वाढवण्यासाठी स्किन केअर प्रॉडक्टमध्ये बदल करावा. डोळ्यांखाली त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे डेड स्किन काढताना मसाज केला जातो. या मसाजमुळे डोळ्यांखाली त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.
बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. ब्युटी प्रॉडक्टमध्ये अनेक सुगंधित अत्तरांचा किंवा इतर घटकांचा वापर केला जातो. मात्र वारंवार सुगंधित प्रॉडक्ट त्वचेला लावल्यामुळे त्वचा काहीशी खराब होऊन जाते. त्यामुळे चेहऱ्यावर किंवा डोळ्यांच्या खाली कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे त्वचा खराब होण्याची जास्त शक्यता असते.