जिभेवर साचून राहिलेल्या बॅक्टरीयामुळे उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
निरोगी आरोग्यासाठी सगळेच लोक सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे, दात स्वच्छ करणे, नाश्ता इत्यादी अनेक सवयी फॉलो केल्या जातात. या सवयींमुळे आरोग्याला हानी पोहचत नाही. बऱ्याचदा काहींना सकाळी उठल्यानंतर दात किंवा स्वच्छ करण्याची सवय नसते. पण असे केल्यामुळे जिभेवर बॅक्टरीया वाढून शरीराला त्रास होऊ लागतो. यामुळे दातांमध्ये वाढलेल्या वेदना, हिरड्या दुखणे, दात किडणे किंवा दातांची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जिभेवर अन्नपदार्थांचे कण तसेच साचून राहिल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. याचा संपूर्ण शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)
फॅटी लिव्हर ठरतोय जीवाचा ‘पक्का वैरी’, ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत Sample Diet
दैनंदिन आयुष्य जगताना शरीराच्या सर्वच अवयवांची योग्य ती काळजी घ्यावी. शरीरातील जीभ हा देखील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जिभेवर साचून राहिलेल्या घाणीमुळे बॅक्टेरियांची वाढ, तोंडात इन्फेक्शन, चव कमी होणे, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जिभेवर साचून राहिलेल्या घाणीमुळे कोणत्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
जेवताना अन्नपदार्थ सगळ्यात आधी जिभेवरून पोटात जातात. मात्र बऱ्याचदा काहींना जेवण केल्यानंतर गुळण्या करण्याची आवश्यकता असते. गुळण्या केल्यामुळे दातांमध्ये साचून राहिलेले अन्नाचे कण बाहेर पडून जातील, ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ तोंडात तसेच कुजून राहणारआहे. जेवणानंतर दात योग्य पद्धतीने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
जेवण जेवताना बऱ्याचदा अननपदार्थाची किंवा घरी बनवलेल्या पदार्थांची व्यवस्थित चव लागत नाही. जिभेवर साचून राहिलेल्या घाणीच्या पेशींमुळे चव घेणे सुद्ध कठीण होऊन जाते. यामुळे दात हळूहळू खराब होऊ लागतात. जिभेवर अतिशय बेचव किंवा कडू चव लागण्यास सुरुवात होते. कोणताच पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही.
वारंवार ब्रश किंवा दात स्वच्छ न केल्यामुळे तोंडात इंफ्केशन होण्याची जास्त शकता असते. तोंडात इंफ्केशनमुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे. तोंडामध्ये वाढलेले इंफ्केशन हळूहळू मोठ्या आजारांचे स्वरूप घेते. त्यामुळे शरीताय दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीस आवश्यक असलेल्या पदार्थांचे आणि स्वछतेकडे लाख द्यावे.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयाचे नियमित सेवन, महिनाभरात दिसाल स्लिम
लहान मुलांसह मोठे सुद्धा जेवणानंतर अन्नपदार्थ किंवा जेवल्यानंतर दात, जीभ स्वच्छ करणे आवश्यक्य आहे. दातांवर साचून राहिलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या चिकय थरामुळे दात खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित दात घासताना मिठाचे पाण्याने दात आणि तोंड स्वच्छ करावे.