Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

Constipation: वाढत्या बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात पेरचा समावेश करावा. पेर खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते आणि फायबर युक्त घटकांमुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2026 | 03:35 PM
Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा 'या' फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा 'या' फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

Follow Us
Follow Us:

बद्धकोष्ठतेच्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष:
बद्धकोष्ठता वाढण्याची कारणे?
पेर खाण्याचे गुणकारी फायदे?

Constipation: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. काहीच करण्याची अजिबात इच्छा होत नाही. कारण आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक शरीराच्या पचनक्रियेवर परिणाम करतात, ज्यामुळे ऍसिडिटी, अपचनाच्या समस्या आणि बद्धकोष्ठता वाढून आरोग्य बिघडून जाते. पोट जड होणे, शौचास कडक होणे, पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे या अतिशय सामान्य समस्या आहे. पण सामान्य वाटणाऱ्या समस्यांचं आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे कारण ठरतात.(फोटो सौजन्य – istock)

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, कमी पाण्याचे सेवन, वारंवार जंक फूड खाल्ल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर थेट परिणाम होतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. पोटातील अन्न पुन्हा उलटे फिरल्यानंतर घशात जळजळ, छातीत वेदना किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे वाढत्या अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित या फळाचा आहारात समावेश करावा. नियमित एक पेर खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. पेरमध्ये भरपूर प्रमाणात पाणी, फायबर आणि नैसर्गिक संयुगे असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया पेर खाण्याचे फायदे.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेर गुणकारी:

बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्यानंतर अपचनाच्या समस्या कायमच उद्भवतात. अशावेळी पेर खावे. पेर खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळते. फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत चालू राहते. यामध्ये न विरघळणारे फायबर असतात, विष्ठेला योग्य आकार देतात. पोट स्वच्छ करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा आवर्जून समावेश करावा. पेरमध्ये सॉर्बिटॉल नावाचे नैसर्गिक शुगर अल्कोहोल असते, ज्यामुळे आतड्यांमध्ये पाणी खेचून घेतले जाते आणि विष्ठा मऊ होते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात एक पेर खावे.

आतड्यांमधील चांगले जिवाणू:

पेर खाल्ल्यामुळे केवळ पोट स्वच्छ होत नाहीतर आतड्यांची हालचाल सुद्धा सुलभ चालू राहते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमध्ये चांगले विषाणू तयार करतात. आतड्यांच्या आतील अस्तराचे आरोग्य राखण्यासाठी आणि पचनसंस्था कायमच संतुलित ठेवण्यासाठी आहारात पेर आणि इतर पाणीदार फळांचा समावेश करावा.याशिवाय भरपूर पाणी, शारीरिक हालचाल आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फायबर असलेल्या फळांचा आहारात समावेश केल्यास पचनसंस्था कायमच निरोगी राहते.

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी

बद्धकोष्ठतेच्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष:

शौचामधून रक्त पडणे, अचानक वजन कमी होणे, पोटात सतत तीव्र वेदना होणे, उलट्या होणे, ताप येणे, शौचाच्या सवयींमध्ये होणारे बदल इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण आतड्यांचा कॅन्सर किंवा आतड्यांमध्ये अल्सर तयार झाल्यानंतर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: आठवड्यात कमी वेळा शौच होणे, शौच कडक होणे, शौच करताना जास्त जोर लावावा लागणे किंवा शौच पूर्णपणे झाले नाही असे वाटणे याला बद्धकोष्ठता म्हणतात.

  • Que: बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी फळे मदत करतात का?

    Ans: होय. तंतुमय पदार्थ (फायबर) आणि पाण्याचे प्रमाण असलेली फळे शौच मऊ करण्यास आणि आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करू शकतात.

  • Que: कोणते फळ बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर ठरू शकते?

    Ans: पेरू, पपई, संत्री, सफरचंदासारखी फायबरयुक्त फळे आहारात समाविष्ट करता येतात. काही लोकांना प्रून्स किंवा मनुका यांचाही फायदा होऊ शकतो.

Web Title: Constipation flush out accumulated decaying waste from your intestines make this fruit a regular part of your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • constipation
  • Digestion Problem
  • healthy fruits

संबंधित बातम्या

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
2

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.