वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन
शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडते आणि वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध आणि डाएट फॉलो केला जातो. पण त्याऐवजी नियमित आहारात जवसाच्या चटणीचे सेवन केल्यास महिनाभरात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. महिलांच्या आरोग्यासाठी आळशी अतिशय प्रभावी ठरतात. जवस खाल्यामुळे वजन कमी होण्यासोबत संपूर्ण शरीराला फायदे होतात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ही चटणी शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. अनेक लोक जवसाच्या बियांचे सेवन सॅलड, दही किंवा स्मूदीमध्ये सुद्धा टाकून खातात. चला तर जाणून घेऊया जवस चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव
तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश