
दारूचे सेवन न करता आतून कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
दारू न पिता लिव्हर कुजण्याची कारणे?
लिव्हरमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाय?
लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणते घटक गुणकारी ठरतात?
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. बऱ्याचदा शरीराला झालेल्या गंभीर आजारांची लक्षणे शरीरात लवकर दिसून येत नाहीत. मात्र कालातंराने लक्षणे वाढू लागतात आणि शरीराला हानी पोहचते. लिव्हर शरीरातील अननपदार्थ पचन करण्यासोबतच ५० पेक्षा जास्त कामे करते. लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण रक्तात मिक्स झाल्यानंतर त्वचेवर पिवळेपणा, नख पिवळी होणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक लक्षण दिसून येतात. शरीराचे वाढलेले वजन, जास्त तिखट आणि साखर असलेल्या पदार्थांचे सेवन, दिवसभर एका जागेवर बसून काम इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर लिव्हरवर अतिरिक्त भार येतो.(फोटो सौजन्य – istock)
World AIDS Day 2025 : AIDS इन्फेक्शन कशामुळे पसरतो? संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
लिव्हर खराब होण्यामागे दारूसुद्धा कारणीभूत ठरते. सतत दारू आणि मद्यपान केल्यामुळे लिव्हर खराब होणे, लिव्हर कॅन्सर, फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला दारूचे सेवन करता कुजलेले लिव्हर स्वच्छ करण्यासाठी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. लिव्हरमध्ये साचलेला कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी न चुकता घरगुती आणि नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी च्या सेवनामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते. ग्रीन टी मध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या खराब पेशी बाहेर पडून जातात. याशिवाय यामध्ये असलेले कॅटेचिन लिव्हरला आलेली सूज कमी करण्यासाठी मदत करते. वाढलेले वजन कमी करताना दिवसभरातून दोनदा किंवा तीनदाच सेवन करावे. यामुळे लिव्हर स्वच्छ होते.
संपूर्ण शरीरासाठी बीट वरदान ठरते. नियमित सकाळी उठल्यानंतर बीटच्या रसाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. बीटच्या रसात असलेले शक्तिशाली घटक लिव्हरमधील घातक तणावाला कमी करून शरीरातील पेशींचे रक्षण करतात. शरीरात निर्माण झालेली पचनाची समस्या दूर करण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटच्या रसाचे सकाळी आणि दुपारच्या वेळी सेवन करावे. शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी बीटचा रस फायदेशीर मानला जातो.
सकाळी उठल्यानंतर काहींना उपाशी पोटी दुधाचा चहा पिण्याची सवय असते. पण वारंवार दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी आणि पित्त वाढून संपूर्ण पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे उपाशी पोटी चहाचे सेवन करावे. त्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या चरबीच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते आणि शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते.
Ans: रक्ताचे शुद्धीकरण करणे. शरीराला शक्ती देणे.
Ans: पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला दुखणे किंवा सूज येणे.
Ans: हिरव्या पालेभाज्या, सॅल्मनसारखे चरबीयुक्त मासे आणि हळद यांचा आहारात समावेश करा.