अन्ननलिकेमध्ये वाढलेल्या पित्तामुळे सतत अॅसिडीटी होते? मग आहारात करा 'या' फळांचा समावेश
अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी कोणती फळे प्रभावी?
फळे खाण्याचे फायदे?
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. जंक फूडचे अतिसेवन, सतत मसालेदार तेलकट पदार्थ, कोल्ड्रिंक इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला अॅसिडीटी, गॅस, अपचन आणि पोटाच्या समस्या उद्भवत आहेत. पोटात वाढलेल्या जडपणामुळे काहीवेळा दिवसाची सुरुवात व्यवस्थित होत नाही. शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या अॅसिडीटीमुळे गॅस होणे, पोट फुगणे, उल;उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेला गॅस, अॅसिडीटी, अपचन, पोटात वाढलेला जडपणा इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. पण वारंवार मेडिकलच्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करून नैसर्गिकरित्या शरीराची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अन्ननलिकेमध्ये वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पोटफुगी, गॅस, अॅसिडीटी इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळेल आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी किवी हे फळ अतिशय फायदेशीर ठरते. किवीमध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो. कीवीमध्ये ऍक्टिनिडिन नावाचे एन्झाइम आढळून येते, ज्यामुळे अन्नपदार्थातील प्रोटीन चांगल्या प्रकारे पचण्यास होऊन शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. बद्धकोष्ठता किंवा आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी किवीचे सेवन करावे. किवीमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. सकाळच्या नाश्त्यात नियमित पपईचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पोटाच्या समस्येंपासून सुटका मिळेल. पपईमध्ये विटामिन सी सोबतच फायबर देखील आढळून येते. तसेच यामध्ये पपेन नावाचे एक शक्तिशाली पाचक एन्झाइम आढळून येतात, ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होऊन बद्धकोष्ठता नष्ट होते.
तोंडाचा कर्करोग होण्यास जनुकीय घटक जबाबदार! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
आतड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी नियमित २ केळी खावी. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर केळीचे सेवन करावे. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळून येते, ज्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. पोट फुगणे, गॅस, अपचन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळी खावीत.
Ans: काहीही खाता किंवा पिता तेव्हा हवा गिळल्यामुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो.
Ans: पोटात आणि छातीत जळजळ होणे
Ans: थंड दूध प्यायल्याने पोटातील ऍसिड निष्प्रभ होण्यास मदत होते.






