मूळव्याधीवर घरगुती उपाय
मूळव्याध ही सामान्य समस्या आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर किंवा सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रियेत बदल होतो. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात नेहमी थंड आणि शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करावे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे योग्य त्या सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूळव्याधीची समस्या उद्भवल्यानंतर आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबदल सांगणार आहोत. या पदार्थांचे आठवडाभर नियमित सेवन केल्यास मूळव्याधीची समस्या कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘ही’ मिठाई नाही वाढवत ब्लड शुगर, यंदाच्या दिवाळीत बिनधास्त घ्या आस्वाद
बाजारात कुळीथ डाळ सहज उपलब्ध होते. या डाळीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात, ज्यामुळे मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. कुळीथ डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. शरीरात फायबरची कमतरता असलेल्यांनी आहारात कुळीथ डाळीचे सेवन करावे. कुळीथ डाळीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कुळीथ डाळ सहज पचन होते, त्यामुळे पचनास जड असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याऐवजी कुळीथ डाळीचे सेवन करावे. यामुळे मूळव्याध बरा होण्यास मदत होते.
मूळव्याधीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबूचा पाण्यात असलेले विटामिन सी आणि इतर गुणधर्म आरोग्य सुधारण्यास मदत करतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मांस, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, गोठलेले पदार्थ, डेली मीट इत्यादी हानिकारक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाणी आणि इतर गुणकारी पदार्थांचे सेवन करावे.
सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. कारण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित आणि पचनसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे दिवसभरात ७ ते ८ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पचनक्रिया निरोगी राहते.
हे देखील वाचा: पोटावरची चरबी जाईल उडून, मांड्याही होतील कमी, या स्वस्त फळांचे सेवन करा
शरीरातील कमी झालेली ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित मनुक्यांचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा मूठ मनुके भिजत घालून रात्रभर ठेवून घ्या. त्यानंतर सकाळी उठल्यावर मनुक्यांच्या पाण्याचे उपाशी पोटी सेवन करा. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी ठरेल. तसेच नियमित मनुके खाल्यास पोट भरलेले राहते. लवकर भूक आणि लागत नाही. मनुक्यांचे पाणी मूळव्याधीवर प्रभावी औषध आहे.