थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा 'या' जादुई पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरात सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, हाडं दुखणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र तरीसुद्धा हवे तसे बरे वाटतं नाही. वातावरणात होणारे बदल, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे नेहमी निरोगी आरोग्य जगणे फार गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरामध्ये झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा आणि चिडचिडेपणा जाणवू लागतो. याशिवाय पचनक्रिया बिघडते. त्यामुळे उत्तम झोपेसाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या चांगल्या झोपेसाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता दूर करण्यासाठी आणि अशक्तपण कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बदाम खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बदाममध्ये ट्रिप्टोफॅन आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक आढळून येतात, जे शरीराला शांत करतात. याशिवाय यामध्ये आढळून येणारे मॅग्नेशियम स्नायूंना आराम देऊन झोपेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स सक्रिय करतात. बदामामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात, यामुळे रात्रीच्या वेळी लागणारी भूक नियंत्रणात राहते. रात्रीच्या वेळी चांगली झोप लागण्यासाठी नियमित ४ किंवा ५ भिजवलेले बदाम खावेत.
दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असते. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित एक ग्लास दुधाचे सेवन करावे. यामध्ये ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन हे घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्रीच्या वेळी कोमट दूध प्यायल्यामुळे मन आणि शरीर शांत होते. त्यामुळे नियमित दुधाचे सेवन करावे.
हर्बल चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. या चहाचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. आलं, पुदिना, तुळशीची पाने, बडीशेप इत्यादी अनेक पदार्थ वापरून बनवलेला चहा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या चहाचे सेवन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो आणि आरोग्य सुधारते. या चहाच्या सेवनामुळे मांसपेशीवरील तणाव कमी होतो आणि शरीर शांत वाटू लागते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केळी खाणे खूप आवडते. केळ्यांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे मज्जातंतूंना आराम मिळतो. स्नायू आणि सांधे दुखीचा समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. केळ्यांचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.