Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ हिरव्या चटणीचे सेवन, संधिवात होईल कायमचा गायब

शरीरात वाढलेले युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हिरव्या चटणीचे सेवन करावे. या चटणीच्या सेवनामुळे युरिक ॲसिडची पातळी कमी होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या हिरवी चटणी खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2025 | 08:52 AM
शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' चटणीचे सेवन

शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा 'या' चटणीचे सेवन

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली,कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मात्र बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष केले जाते. वारंवार दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय धोक्याचे ठरू शकते. हल्ली सर्वच नागरिक युरिक अ‍ॅसिडच्या समस्येने त्रस्त आहेत. शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात, हातापायांमधून वारंवार मुंग्या येणे, गाऊट, हाडांना सूज येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. युरिक अ‍ॅसिड वाढल्यानंतर अनेक लोक डॉटरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेले युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्या चटणीचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

थुलथुलीत पोट- मांड्यांवरील चरबी झपाट्याने जाईल वितळून! उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी ड्रिंक, आठवडाभरात दिसून येईल फरक

लो-प्युरिन हिरवी चटणी:

शरीरामध्ये प्युरिनची पातळी वाढल्यानंतर यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे दैनंदिन आहारात लो प्युरीन डाएट घेणे आवश्यक आहे. तसेच आहारात प्युरीन असलेल्या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. आहारात पुदिना, कोथिंबीर आणि आल्याचा वापर करून बनवलेल्या चटणीचे सेवन करावे. या पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय पुदिन्याच्या पानांपासून बनवलेली चटणी यूरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी अतिशय प्रभावी ठरते.

चटणी बनवण्याची कृती:

चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिना, कोथिंबीर स्वच्छ करून धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर आणि आल्याचा बारीक तुकडा टाकून आवश्यकतेनुसार पाणी घाला. त्यानंतर बारीक पेस्ट तयार करा. चटणी बनवताना तुम्ही त्यात हिरवी मिरची आणि जिरं सुद्धा टाकू शकता. तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. या चटणीचे आहारात नियमित सेवन केल्यास सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा मिळेल आराम! इवलुशी लवंग ठरेल अतिशय प्रभावी, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

यूरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात चटणीसोबत योग्य प्रमाणात पाणी पिणे, पोषक आहार, नियमित व्यायाम करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. याशिवाय वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवल्यास यूरिक ॲसिडची समस्या उद्भवणार नाही. डाळी, राजमा, मांस, मद्यपान इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात यूरिक ॲसिड वाढते आणि सांध्यांमधील वेदना वाढू लागतात. यूरिक ॲसिड कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसोबतच आहारात बदल करून आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

उच्च युरिक ऍसिड म्हणजे काय?

जेव्हा शरीरात युरिक ऍसिडची पातळी जास्त होते, तेव्हा त्याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. यामुळे गाउट (gout) सारखे आजार होऊ शकतात. सामान्यतः, 7.0 mg/dL पेक्षा जास्त पातळीला हायपरयुरिसेमिया मानले जाते.

युरिक ऍसिडची चाचणी कधी करावी?

जर तुम्हाला गाउटची लक्षणे असतील.जर तुम्हाला किडनी स्टोनची लक्षणे असतील.जर तुम्ही युरिक ऍसिडच्या पातळीवर परिणाम करणारे उपचार घेत असाल.

उच्च युरिक ऍसिड टाळण्यासाठी काय करावे?

भरपूर पाणी प्या.दारूचे सेवन कमी करा किंवा टाळा.जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.भाज्या, फळे, आणि संपूर्ण धान्ये आहारात जास्त प्रमाणात घ्या.नियमित व्यायाम करा. वजन नियंत्रणात ठेवा.टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume this green chutney in your diet to control the increased uric acid in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.