थुलथुलीत पोट- मांड्यांवरील चरबी झपाट्याने जाईल वितळून!
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या वाढू लागते. बदलेली जीवनशैली, तासनतास एका जागेवर बसून काम, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होतात. शरीरात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर पोट, कंबर आणि मांड्यांवर चरबीचा थर साचून राहण्यास सुरुवात होते. त्यामुळे बऱ्याचदा महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य – istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी बाजारातील वेगवेगळी सप्लिमेंट्स, तासनतास व्यायाम किंवा आहारात अनेक बदल केले जातात. वजन कमी करताना अनेक लोक संध्याकाळच्या वेळी नाश्ता आणि जेवण करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे नियमित पोटभर जेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पोट आणि मांड्यांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हेल्दी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी आणि हेल्दी पेय प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्यात असलेले गुणकारी घटक शरीर कायमच निरोगी ठेवतात. दालचिनीचे पाणी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी गरम पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि तुम्ही स्लिम दिसाल. हे पाणी आठवडाभर नियमित प्यायल्यास सकारात्मक फरक दिसून येईल. याशिवाय दालचिनीच्या पावडरचा वापर चहा, ओट्स किंवा भाज्या बनवताना सुद्धा केला जातो.
लघवीवर नियंत्रण राखता येत नाही? मग या टिप्सचे पालन करा, तज्ज्ञांनी दिला सल्ला
आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळीमिरी जेवणातील पदार्थ बनवताना वापरली जाते. मसाले किंवा इतर तिखट मसाले तयार करताना काळीमिरीचा वापर केला जातो. यामध्ये पायपरिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते आणि तुम्ही स्लिम दिसू लागता. गरम पाण्यात काळीमिरी पावडर, तूप आणि मध मिक्स करून नियमित प्यावे.
वजन कमी करण्यासाठी किती वेळ लागतो?
वजन कमी करण्याचा कालावधी व्यक्तीपरत्वे बदलतो. काही महिन्यांत चांगले परिणाम दिसू शकतात.
वजन कमी करताना आहारामध्ये काय बदल करावे लागतील?
प्रक्रिया केलेले अन्न, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ कमी करा आणि फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने आहारात वाढवा.
वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
जास्त कॅलरी, चरबी आणि साखर असलेले पदार्थ, तसेच अति प्रमाणात मद्यपान आणि धूम्रपान टाळा. टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.