चमचाभर अळशीच्या बिया केसांसाठी ठरतील वरदान! 'या' पद्धतीने घरीच तयार करा हेअर मास्क
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर कधी हेअर स्पा करून केसांची काळजी घेतली जाते. पण बदलेले हवामान, प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक गोष्टींचा प[परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. सतत केमिकल युक्त शॅम्पूचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे केस स्वच्छ करण्यासाठी अतिशय साध्य आणि सल्फेट फ्री शँम्पूचा वापर करावा. यामुळे केस कोरडे होत नाही. वारंवार केस सुंदर दिसण्यासाठी केलेल्या केमिकल ट्रीटमेंट केस पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे कोणतीही केमिकल ट्रीटमेंट करताना केसांची गुणवत्ता खराब होणार नाही,याची खात्री करून नंतरच करावी.(फोटो सौजन्य – istock)
केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर दुर्लक्ष न करता घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रोटीन आणि फायबर्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते तसेच एनर्जी लेव्हल वाढण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अळशीच्या बियांचा हेअर मास्क बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हेअरमास्क लावल्यामुळे केस अतिशय मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. तसेच अळशीच्या बिया हलक्याशा भाजून घ्या. या बिया नियमित एक चमचा खाल्ल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील.
हेअर मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, अळशीच्या बिया पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. ४ तासानंतरब अळशीच्या बिया भिजल्यानंतर काहीशा मऊ होतील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अळशीच्या बिया टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये घेऊन त्यात कोरफड जेल मिक्स करा आणि केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून ३० मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करून केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून एकदा अळशीच्या बियांचा हेअरमास्क केसांवर लावल्यास केस अतिशय मुलायम होतील.
अळशीच्या बिया आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहेत. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी अळशीच्या बिया नियमित खाव्यात. यामुळे हृदयाचे आरोग्य कायमच चांगले राहते. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अळशीच्या बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. हृदयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अळशीच्या बियांचे नियमित सेवन करावे. अळशीच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमध्ये घाण साचून राहत नाही. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि पोटासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अळशीच्या बियांचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करताना अनेक वेगवेगळ्या बियांचे सेवन केले जाते. मात्र नियमित अळशीच्या बियांचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि लिग्रान्स आढळून येते, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. अळशीच्या बिया खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.