डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांच्या रंगांवरून ओळख शरीरातील पोषक घटकांची कमतरता!
डोळ्यांभोवती काळे डाग किंवा डार्क सर्कल्स येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. महिलांसह पुरुषांच्या सुद्धा डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स येतात. यामुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. डोळ्यांखाली आलेले काळे डाग त्वचेचे सौंदर्य नष्ट करून टाकतात. तसेच काहीवेळा चेहरा आजारी असल्यासारखा वाटू लागतो. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता, पोषक घटकांचा अभाव आणि अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढू लागतात. यामुळे सतत थकवा, अशक्तपणा वाढतो. शरीरात निर्माण झालेल्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे काहीवेळा डोळ्यांभोवती काळे डाग वाढू शकतात. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकते.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांभोवती काळे डाग वाढल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज वाटू लागते. डार्क सर्कल्स काळसर, निळसर, तपकिरी किंवा लालसर रंगाचे असतात. शरीरात निर्माण झालेल्या पोषणाच्या अभावामुळे डोळ्यांभोवती डाग वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोळ्यांभोवती काळे डाग वाढतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे त्वचेला वरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त गरजेचे आहे. काहींच्या डोळ्यांभोवती आलेले काळे डाग अतिशय काळे असतात, तर काहींच्या डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल्स निळसर रंगाचे असतात. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत केमिकल प्रॉडक्ट आणि इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र कोणत्या कारणामुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत, हे कधीच पहिले जात नाही. शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे काळे डाग येतात. त्यामुळे आहारात पालक, डाळिंब, डाळी, बीट, गूळ इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
डोळ्यांभोवती वाढलेले डार्क ब्राऊन रंगाचे डार्क सर्कल्स पिगमेंटेशनमुळे येतात. त्यामुळे त्वचेला नियमित सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून सनस्क्रीन त्वचेचे रक्षण करते. त्यामुळे सनस्क्रीन खरेदी करताना त्यात विटामिन ‘सी’, नायसिनामाइड आणि कोजिक ऍसिड असलेले सनस्क्रीन खरेदी करावे.
पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अल्कोहोल किंवा वॉटर रिटेन्शनमुळे डोळ्यांभोवती काळे डाग येण्यासोबतच डोळ्यांना सूज सुद्धा येते. दैनंदिन आहारात मिठाचे खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यास डोळ्यांना सूज येऊन डोळे लाल होतात. अशावेळी डोळ्यांवर काकडीचे तुकडे ठेवावे. यामुळे डोळ्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी होते.