शेवग्याच्या पानांचे किडनीला होणारे फायदे
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या शेंगांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास हाडांसह इतर सर्वच दुखणे कमी होऊन आराम मिळेल. अनेकांना दैनंदिन आहारात सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. आहारामध्ये पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्यांचे सेवन केल्यास पचनसंस्था चांगली राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. त्यातील सगळ्यांचं आवडीची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी. चवीला कडू असलेली बारीक पानांची भाजी अनेक लोक आवडीने खातात.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. या भाजीचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते. शेवग्याच्या पानांची पावडर करून रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्यामुळे किडनी स्वच्छ होऊन किडनीमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेगव्याच्या पावडरचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शेवग्याच्या पानांची पावडर गरम पाण्यात टाकून प्यायल्यामुळे किडनीमधील सर्व घाण स्वच्छ होते. शिवाय या पाण्याच्या सेवनामुळे किडनी डिटॉक्स होऊन स्वच्छ होते. यामध्ये आढळून येणारे नैसर्गिक गुणधर्म किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकतात. शिवाय यामुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि शरीर स्वच्छ होते.
रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वाढलेले रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस प्यावा. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि किडनीवरील ताण कमी होऊन शरीर स्वच्छ राहते. शिवाय किडनीचे कार्य सुधारण्यासाठी शेवग्याच्या पानांचा रस प्यावा.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शेवग्याच्या पावडरमध्ये आढळून येणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म, युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय हे गुणधर्म युरीनरी ट्रॅक्टमधील बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत करतात., त्यामुळे कोमट पाण्यात मिक्स करून तुम्ही शेवग्याची पावडर पिऊ शकता. किडनीच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात मिक्स करून प्यावी. किंवा तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजीसुद्धा खाऊ शकता.