रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी करा 'या' लाल रसाचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येत आहे., सतत काम, आहाराकडे दुर्लक्ष, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याचा अभाव, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता कायमच योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा शरीरात थकवा, अशक्तपणा किंवा ऍसिडिटी वाढू लागते. या सर्व समस्यांमुळे काहीवेळा मूड बिघडून जातो. तसेच कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि शरीरसंबंधित इतर आजार वाढू लागतात. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या रसाचे सेवन करावे? बीटचा रस प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी बीटच्या रसाचे सेवन करावे. बीट आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक लोहाची कमतरता भरून काढतात. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी बीटच्या रसाचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. बीट आणि चिया सीड्सचा रस नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहेत. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि शरीराच्या हालचालींमध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. शरीरात साचलेल्या घाणीमुळे काहीवेळा पोटात जडपणा जाणवू लागतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बीटचा रस प्यावा.
रक्तात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी बीटच्या रसाचे सेवन करावे. याशिवाय बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते. याशिवाय लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी बीटचा रस प्यावा. ऍनिमिया सारख्या गंभीर आजारापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित बीट आणि लोहयुक्त पदार्थांचे रोजच्या आहारात कायमच सेवन करावे.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना चेहऱ्यावर सूज किंवा चेहरा काळवंडलेला वाटू लागतो. पण नियमित सकाळी उठून बीटच्या रसाचे सेवन केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि चेहरा अतिशय सुंदर दिसेल. यामध्ये असलेले विटामिन सी आणि लोह चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स आणि पुरळ घालवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बीट आणि चिया सीड्सचे सेवन करावे. याशिवाय बीटच्या रसाचे सेवन केल्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.
बीट खाण्याचे फायदे:
बीटमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड असल्याने ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते आणि ऑक्सिजनची पातळी सुधारते. बीटचा रस रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.
बीट खाण्याचे दुष्परिणाम आणि खबरदारी:
बीटमध्ये साखर असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचे सेवन करावे. किडनी स्टोन असलेल्या लोकांनी बीट खाऊ नये, कारण ते हानीकारक असू शकते.