रताळं खाण्याचे फायदे
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा वाढू लागल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात रताळी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. रताळी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली रताळी खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. रताळ्यांमध्ये फायबर्स, विटामिन ए, विटामिन सी आणि बी-6, पोटॅशियम, मॅग्ननिज इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी रताळ्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हिवाळ्यात शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, हृदयावर येणार नाही ताण
सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये काय बनवावं? हा प्रश्न पडल्यास तुम्ही नाश्त्यात रताळी शिजवून खाऊ शकता किंवा रताळ्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित एक रताळ खाल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. विटामिन आणि मिनरल्सने समृद्ध असलेले रताळे खाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतील. रताळ्यांपासून तुम्ही भाजी, खीर, शिरा, गोड रताळी इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता.
रताळ्यांमध्ये असलेले एंटीऑक्सिडेंट्स त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत करतात. वजन वाढण्यासाठी रताळ्याचे सेवन केले जाते. कारण यामध्ये असलेले गुणधर्म वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. फ्री रॅडीकल्सपासून त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आहारात रताळी खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीरसंबंधित अनेक गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात रताळ्याचे सेवन करावे. रताळे तुम्ही भाजून किंवा शिजवून सुद्धा खाऊ शकता.
रताळं खाण्याचे फायदे
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. मात्र तरीसुद्धा वजन कमी होत नाही. अशावेळी आहारात बदल करून पौष्टिक आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात कोणतेही तेलकट पदार्थ खाण्याऐवजी रताळी उकडवून किंवा भाजून खावीत. रताळी खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. रताळे खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. रताळ्यांमध्ये असलेले विटामिन ई त्वचेची चमक वाढवण्यासाठी मदत करतात.
हे देखील वाचा: तिशीनंतरच्या महिलांनी या 5 गोष्टी खाणं टाळावं, वयाआधी येईल म्हातारपण
चवीला हलकी गोड असलेली रताळी आरोग्यासाठी भरपूर पौष्टिक आणि गुणकारी आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात रताळ्याचे सेवन करावे. रताळी खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात रताळ्याचे सेवन करावे.