हिवाळ्यात रक्तप्रवाह सुधारण्यासाठी या फळांचे करा सेवन
राज्यभरात सगळीकडे थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पण असे न करता योग्य आहार घेऊन शरीराची काळजी घ्यावी. थंडीमध्ये आहारात बदल करावा. या दिवसांमध्ये आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. कारण थंडी वाढल्यामुळे शरीरातील ऊर्जा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. तसेच हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचित होण्याची शक्यता असते.यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. हृदयाचे आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तदाब वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकाराचा धोका इत्यादी समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात फळांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: तिशीनंतरच्या महिलांनी या 5 गोष्टी खाणं टाळावं, वयाआधी येईल म्हातारपण
सर्वच ऋतूंमध्ये बाजारात फळे उपलब्ध असतात. फळांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित एका फळाचे सेवन करावे. फळांमध्ये नैसर्गिक गोडवा, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वे आढळून येतात. शिवाय फळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात. फळाचे सेवन केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाला ऊर्जा मिळते आणि इतर आजारांचा धोका कमी होतो. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बाजारात सर्वच ऋतूंमध्ये डाळींब उपलब्ध असतात. डाळिंब खाल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. या फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. डाळिंबामध्ये आढळून येणारा प्युनिकॅलाजिन नावाचा घटक कोलेस्टेरॉल कमी करून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. त्यामुळे नियमित एक डाळिंब खावे.
हिवाळ्यात रक्तप्रवाह सुधारण्यासाठी या फळांचे करा सेवन
विटामिन सी युक्त संत्र आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल मदत करते. या फळाचे नियमित सेवन केल्यास शरीरासह त्वचेला अनेक फायदे होतील. संत्र्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. संत्र्याचा रस प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
हिवाळ्यात रक्तप्रवाह सुधारण्यासाठी या फळांचे करा सेवन
डॉक्टरांकडे गेल्यानंतर नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंद खाल्यामुळे कोणतेही आजार होत नाही. शरीर निरोगी राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. सफरचंदमध्ये असलेले फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. रक्तवाहिन्यांमधील रक्त भिसरण सुधारण्यास मदत होते.
हे देखील वाचा: हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ विटामिन डी युक्त पदार्थांचे सेवन, हाडं राहतील मजबूत
हिवाळ्यात रक्तप्रवाह सुधारण्यासाठी या फळांचे करा सेवन
हिवाळ्यामध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. चवीला आंबट गोड असलेली स्ट्रॉबेरी लहान मुलांसह मोठ्यांना खूप आवडते. त्यामुळे आहारात तुम्ही स्ट्रॉबेरीचे सेवन करू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. रक्तवाहिन्या लवचिक बनतात.