फोटो सौजन्य - Social Media
अचानक केस झपाट्याने गळू लागणे, केसांचा राठपणा वाढणे किंवा कमी वयातच पांढरे केस दिसू लागणे… या त्रासांमागे अनेकदा एक लपलेला दोषी असतो. विटामिन B12 ची गंभीर कमतरता. हे व्हिटॅमिन म्हणजे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी जणू संजीवनीच, कारण याची पातळी कमी झाली की केसांची वाढ मंदावते आणि मुळं कमकुवत होतात. शरीरात रेड ब्लड सेल्स तयार करण्याचं महत्वाचं काम B12 करतं आणि हेच RBC केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण पोहोचवतात. त्यामुळे जेव्हा B12 कमी होतं, तेव्हा स्कॅल्पला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, फॉलिकल्स कमकुवत होतात आणि केस सहज गळू लागतात.
इतकंच नव्हे, तर B12 मेलेनिन निर्मितीसही मदत करणारा घटक आहे, ज्यामुळे केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकतो. त्यामुळे या व्हिटॅमिनची कमतरता मेलेनिन कमी करते आणि कमी वयातच केस पांढरे होण्याची शक्यता वाढते. चांगली बाब म्हणजे योग्य आहार घेतल्यास ही कमतरता सहज भरून काढता येते. कारण शरीर स्वतः B12 तयार करत नाही, त्यामुळे अन्नातूनच ते मिळावं लागतं आणि विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये याची कमतरता जास्त दिसते, कारण B12 प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थांमध्ये मिळतो. दूध, दही, पनीर आणि छाछ हे शाकाहारींसाठी B12 चे सर्वात सोपे स्रोत आहेत; रोज एक ग्लास दूध किंवा जेवणात दही घेतल्यास फायदा होतो.
अंडी प्रोटीनसोबत B12 चा उत्तम स्रोत असून अंड्याच्या पिवळ्या भागात हे व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे दररोज १–२ अंडी खाल्ल्यास गरज पूर्ण होते. नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी सॅल्मन आणि टूना सारख्या माशांमध्ये B12 आणि ओमेगा-3 दोन्ही भरपूर असल्याने केस मजबूत होतात, मात्र डीप फ्राय न करता ग्रिल किंवा स्टीम केलेली मच्छी अधिक पौष्टिक मानली जाते. शाकाहारी लोकांसाठी पर्याय म्हणून फोर्टिफाइड फूड्स, जसे ब्रेकफास्ट सीरियल्स, सोया मिल्क, बादाम मिल्क आणि न्यूट्रिशनल यीस्ट हे उत्कृष्ट पर्याय ठरतात.
याशिवाय दही हा सहज उपलब्ध आणि उपयुक्त स्रोत आहे, कारण त्यातील प्रोबायोटिक्स पोषण शोषण सुधारून B12 च्या कमतरतेवर चांगला परिणाम करतात. जर तुमचे केस अचानक गळू लागले असतील, सतत थकवा जाणवत असेल किंवा केस अकाली पांढरे होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन B12 ची तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य आहार, नियमित दिनचर्या आणि संतुलित जीवनशैली अंगीकारल्यास विटामिन B12 ची कमतरता दूर होते आणि केस पुन्हा घनदाट, मजबूत आणि नैसर्गिक चमकदार होतात.






