दैनंदिन आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास किडनी सडून होईल मुतखडा
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. सकाळची सुरुवात नाश्त्याने होते. पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी नाश्त्यात खाल्ले पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे कायमच आहारत पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा आहारात तिखट, तेलकट आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी मदत करते. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. विषारी घटक शरीरात साचून राहिल्यामुळे काहीवेळा मुतखडा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनीच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ अतिशय घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे किडनी निकामी होईल.(फोटो सौजन्य – istock)
Cholesterol कायमचं वाढत? मग जेवताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कधीच वाढणार नाही कोलेस्ट्रॉल लेव्हल
काहींना सकाळच्या नाश्त्यात किंवा आहारात बेकन, सॉसेज किंवा सलामीसारखे प्रोसेस्ड मीट खाण्यास खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांच्या सेवनामुळे किडनीवर जास्त ताण येतो. कारण यामध्ये सोडियम व फॉस्फरस इत्यादी घटक आढळून येतात.प्रोसेस्ड मासांमधील प्रिझर्वेटिव्ह्जमुळे शरीराला सूज येते. याशिवाय कालांतराने किडनीसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात प्रोसेस्ड मांसचे अजिबात सेवन करू नये.
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक चोकोस, कॉंफ्लेक्स इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखी गंभीर समस्या उद्भवते. शरीरात वाढलेले साखरेचे प्रमाण किडनीच्या कार्यावर परिणाम करते.त्यामुळे जास्त कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स, म्युसली किंवा ब्रान फ्लेक्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
दैनंदिन आहारात नियमित वाटीभर दही खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. दह्यामध्ये असलेले घटक शरीर कायमच निरोगी ठेवतात. याशिवाय पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करावे. पण अनेकांना फ्लेवर्ड दही खाण्याची सवय असते. या दह्यामध्ये खूप जास्त साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि फॉस्फेट्स आढळून येतात. अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच आहारात अतिगोड पदार्थ खाल्यामुळे किडनीवर तणाव येतो.
बाळ ऐकत नाही तर त्याला मारून समजवू नका! ‘हे’ घ्या टिप्स, कामी येतील
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नूडल्स खायला खूप जास्त आवडतात. पण काहीवेळा घाईगडबडीच्या वेळी इंस्टंट नूडल्स बनवून खाल्ले जाते. हे नूडल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. पण वारंवार इंस्टंट नूडल्सचे सेवन केल्यामुळे किडनी खराब होण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आहारात कमी मीठ आणि कमी तिखट पदार्थांचे सेवन करावे.
किडनी स्टोन म्हणजे काय?
युरिनरी कॅल्क्युली (Urinary Calculi) किंवा रिनल कॅल्क्युली (Renal Calculi) देखील म्हणून ओळखले जातात.हे कॅल्शियम ऑक्झिलेट किंवा युरिक ऍसिडचे स्फटिक असतात जे मूत्रात जास्त प्रमाणात खनिजे आणि कमी द्रवपदार्थ असल्यामुळे तयार होतात.
किडनी स्टोनची लक्षणे?
सामान्यत: लक्षणे नसतात, परंतु जेव्हा स्टोन मूत्रमार्गात सरकतो किंवा अडथळा निर्माण करतो तेव्हा तीव्र वेदना सुरू होतात.या वेदना पाठ, पोट किंवा ओटीपोटात जाणवू शकतात.
किडनी स्टोन होऊ नये म्हणून उपाय:
दिवसाला 2-3 लिटर पाणी पिऊन मूत्र पातळ ठेवल्यास स्टोन तयार होण्यापासून रोखता येते आणि ते बाहेर काढण्यास मदत होते. मिठाचे आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. जास्त प्रथिने आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.