Cholesterol कायमचं वाढत? मग जेवताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय काहीवेळा अपचन, कोलेस्ट्रॉल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉकडे दुर्लक्ष केले जाते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामुळे शरीरात निरोगी फॅट्स वाढतात. पण वाईट कोलेस्टरॉलमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय योग्य वेळी लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक येऊन मृत्यू होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)
Vaginal Gas: योनीमध्ये गॅससाठी जबाबदार ठरतात 5 कारणं, प्रतिबंध करण्याची पद्धत
रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराला हानी पोहचवते. त्यामुळे काहीवेळा अचानक चक्कर येणे, थकवा आल्यासारखा वाटणे, हातापायांमध्ये वेदना इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने औषध उपचार करणे आवश्यक आहे. उच्च कोलेस्टरॉलमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून जेवताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात चांगल्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. आहारात जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, खूप जास्त बटर लावलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. या पदार्थांमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढवतात. याशिवाय दैनंदिन आहारात ऑलिव्ह ऑइल, सुकामेवा आणि फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे, भाज्या, सुका मेवा इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
STI Problem: 40% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त, लाजेमुळे उपचारास विलंब; तज्ज्ञांचा खुलासा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कारण फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते आणि पचनाची समस्या उद्भवत नाही. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुपात लसूण भाजून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते. चिया सीड्स, जवस, अक्रोड इत्यादी पदार्थांमधून सुद्धा ओमेगा ३ फॅटी ऍसिड शरीराला मिळते. आहारात गोड आणि खारट पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कारण अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे मधुमेह वाढू शकतो.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळणारा एक मेणासारखा मेद (lipid) आहे.शरीराला हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि पित्त (bile) तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार:
एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल, एचडीएल (HDL) कोलेस्ट्रॉल
उच्च कोलेस्ट्रॉलची कारणे:
संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट्सचे जास्त सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढू शकते. व्यायामाचा अभाव आणि बैठी जीवनशैली यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.