उपाशी पोटी 'या' पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये तयार होईल विष
सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंदी होण्यासाठी व्यायाम, ध्यान किंवा योगासने केली जाते. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि थकवा तणाव कमी होतो. पण अनेकांना झोपेतून उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची किंवा नाश्ता करण्याची सवय असते. उपाशी पोटी सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात गॅस तयार होणे, उलट्या, मळमळ किंवा पचनासंबंधित समस्या वाढू लागतात. उपाशी पोटी कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास ते शरीराला सहज पचन होत नाही. यामुळे आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टरीया तयार होऊन पोटाचे आरोग्य बिघडून जाते. उपाशी पोटी कोणतेही पदार्थ खाल्यामुळे ऍसिडिटीसोबतच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये विषा सामान घटक तयार होतील.(फोटो सौजन्य – istock)
उपाशी पोटी आंबट फळांचे अजिबात सेवन करु नये. आंबट फळांच्या सेवनामुळे अन्ननलिकेमध्ये आम्ल्पित्त वाढते आणि सतत आंबट ढेकर येणे, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. आंबट फळांच्या सेवनामुळे पोटाच्या आतील आवरणाला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. तसेच ऍसिडिटी, पित्त वाढून छातीमध्ये सतत जळजळ होते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केळी खायला खूप जास्त आवडतात. पण उपाशी पोटी केळी खाल्ल्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. शरीरातील मॅग्नेशियमची पातळी अचानक वाढून हृदयाचे कार्य बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच कोणत्याही फळांचे सेवन करू नये.
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. चहा आणि बिस्कीट खाल्ल्यानंतर पोट लगेच भरते, पण उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढू लागते. बिस्किटांमध्ये असलेला मैदा पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. तसेच उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे पोटात आम्ल्पित्त वाढते.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वाटीभर दही खाण्याचा सल्ला दिला जातो. पण उपाशी पोटी दही खाल्यास आंबट ढेकर येऊ लागतात. तसेच उपाशी पोटी थंड फळे, कोल्ड्रिंक, मसालेदार, तिखट पदार्थ खाऊ नये. यामुळे पोटदुखी, सूज किंवा अल्सरचा धोका वाढून आरोग्य बिघडते.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी म्हणजे पोटात ऍसिड तयार होणे. हे ऍसिड अन्न पचनासाठी आवश्यक असले तरी, जेव्हा ते जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा छातीत जळजळ, अपचन, आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
ऍसिडिटीची लक्षणे काय आहेत?
छातीमध्ये जळजळ होणे हे ऍसिडिटीचे सर्वात सामान्य लक्षण आहे.अन्न नीट पचत नाही, त्यामुळे पोट जड वाटते. तोंडात आंबट किंवा कडवट चव येते.पोटात दुखणे किंवा कळ येणे.
ऍसिडिटीवर काय उपचार आहेत?
थंड दूध प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते.वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने आराम मिळतो.बडीशेप खाल्ल्याने ऍसिडिटी कमी होते.