
फास्ट फूडमुळे कॅन्सरचा धोका (फोटो सौजन्य - iStock)
तज्ज्ञांच्या मते फास्ट फूडमध्ये असलेले मीठाचे अधिक प्रमाण, साखरेचे जास्त प्रमाण, ट्रान्स-फॅट आणि प्रोसेस्ड घटक शरीरातील दाह (inflammation) निर्माण करतात आणि पेशींमध्ये बदल घडवून कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. विशेषतः बर्गर, पिझ्झा, फ्राईड आयटम्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड मीटचा वारंवार वापर अधिक धोकादायक मानला जातो.
Cancer: पुरुषांना ओरल आणि महिलांना ब्रेस्ट कॅन्सर अधिक, कसे वाचू शकाल? 5 टिप्स देऊ शकतात मुक्ती
काय सांगतो अभ्यास
ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे लोक वारंवार, मोठ्या प्रमाणात आणि अनेकदा रात्री उशिरा जंक फूडचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. यामुळे लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिक सिंड्रोम वाढतो, जे स्तनाचा, कोलनचा आणि यकृताच्या कर्करोगाशी संबंधित असल्याचे अभ्यास दर्शवतात.
तज्ज्ञांनी फूड डिलिव्हरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि कोटेड पॅकेजिंगमध्ये असलेले PFAS, बीपीए-BPA आणि माइक्रोप्लास्टिक्स ही रसायनेही धोकादायक असल्याचे सांगितले. गरम अन्नाशी संपर्क आल्यावर ही रसायने अन्नात मिसळू शकतात आणि दीर्घकाळात कर्करोग वाढण्याचा धोका निर्माण होतो.
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. गौरव जसवाल, रेडिएशन ऑन्कोलॉजी, टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, तळेगाव, सांगतात की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंग हा एक सोपा मार्ग वाटत असला आणि लोकांना वाटते की अधूनमधून फास्ट फूड खाल्ल्याने काही फरक पडत नाही, पण ही सततची सवय शरीरात विषारी रसायनांची पातळी वाढवते आणि शरीरातील दाह निर्माण करुन आणि हार्मोनल बदलांमुळे कर्करोगाची सुरुवात करण्यास कारणीभूत ठरते.
डॉ. जसवाल पुढे सांगतात की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंगमुळे कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी काही सोप्या सवयींचे पालन करा. शक्यतो घरचे ताजे अन्न खा आणि फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फाईज आणि रेडी-टू-ईट पदार्थांपासून लांब रहा. तसेच, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि साखर, मीठ व तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवा. या सवयी अंगीकारल्यास शरीरातील दाह आणि हार्मोनल बदल नियंत्रित राहतात, ज्यामुळे कर्करोगासह इतर गंभीर आजारांचा धोकादेखील कमी होतो.
शरीरात कशी होते Cancer ची सुरुवात? कोणकोणते आहेत टप्पे? वेळीच जाणून घ्या आणि स्वतःचे रक्षण करा