Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो ‘या’ कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. जाणून घेऊया मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सरची लागण का होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 05, 2026 | 05:30 AM
मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात वाढतो 'या' कॅन्सरचा धोका, वेळीच सावध होऊन ओळखा लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

कोणत्या वयात मासिक पाळी बंद होते?
मेनोपॉज म्हणजे काय?
मेनोपॉजनंतर कोणत्या कॅन्सरचा धोका वाढतो?

प्रत्येक महिलेला महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक येणे ही शरीरातील नैसर्गिक क्रिया आहे. या दिवसांमध्ये महिलांना खूप जास्त शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये काहीवेळा खूप जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढतो आणि शरीरसंबंधित गंभीर लक्षणे दिसू लागतात. बऱ्याचदा मासिक पाळी येण्याच्या आधी आणि आल्यानंतर खूप जास्त समस्या उद्भवतात. या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. कालांतराने मासिक पाळी वयाच्या ४५ ते ५५ दरम्यान बंद होते. याला मेनोपॉज असे म्हणतात. मेनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या शरीरात होणारी नैसर्गिक क्रिया आहे. पण मेनोपॉज आल्यानंतर महिलांमध्ये खूप जास्त गंभीर समस्या दिसू लागतात. हॉट फ्लॅशेज, रात्री झोप येणे, मूड स्विंग, थकवा व्हजायनल ड्रायनेस आणि फोकस करण्यास समस्या इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

World Cancer Day 2026: डोळ्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावी लागेल दृष्टी

अचानक मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरात हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय मेनोपॉजनंतर महिलांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण सुद्धा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेनोपॉज नंतरच्या काळात महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण का वाढते आणि कोणत्या कॅन्सरची लागण होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. वयाच्या ४० व्या वर्षानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. पण या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि शरीराचे पूर्णपणे नुकसान करतात. त्यामुळे कॅन्सरसंबंधित आजारांची जनजागृती करण्यासाठी संपूर्ण देशभरात सगळीकडे कॅन्सर डे साजरा केला जातो.

मेनोपॉजनंतर कॅन्सरचा धोका का वाढतो?

मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. मेनोपॉजनंतरच्या दिवसांमध्ये शरीरातील अ‍ॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे प्रमाण खूपच कमी होऊन जाते. या बदलांमुळे ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आणि ओव्हरी कॅन्सरचा धोका वाढतो. याशिवाय वय वाढल्यानंतर सुद्धा कॅन्सरचा धोका असतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. यामुळे आजाराचे निदान होऊन जीव वाचेल.

Menopause म्हणजे काय? मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, राहाल कायमच आनंदी

मेनोपॉजनंतर महिलांना कोणत्या कॅन्सरची लागण होते:

महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येणारा आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सरची हिस्ट्री, लठ्ठपणा, मद्यसेवन आणि कमी फिजिकल अ‍ॅक्टिविटी इत्यादी अनेक गोष्टींमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता असते. लठ्ठपणा, मधुमेह आणि हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आतड्यांच्या कॅन्सरचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. आतड्यांचा कॅन्सर हा जीवघेणा कॅन्सर म्हणून ओळखला जातो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

    Ans: मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव, दोन पाळ्यांच्या दरम्यान रक्तस्राव होणे.

  • Que: मासिक पाळीतील बदल कर्करोगाचे संकेत कधी असतात?

    Ans: मासिक पाळीचा कालावधी खूप लांबला असेल, रक्तस्राव सामान्यपेक्षा जास्त असेल

  • Que: पोटातील गाठ कर्करोग आहे हे कसे ओळखावे?

    Ans: जर गाठ वेगाने वाढत असेल, कठीण असेल, आणि त्यासोबतच वजन कमी होणे, ताप येणे किंवा तीव्र वेदना होत असतील, तर ती गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असते.

Web Title: After the cessation of menstruation the risk of this cancer increases in the body of women be alert and recognize the symptoms in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cancer
  • menopause
  • women health

संबंधित बातम्या

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य
1

कॅन्सरच्या 40% प्रकरणांमध्ये बचाव शक्य! फक्त या 5 सवयी बदला; WHO च्या नव्या अभ्यासातून समोर आले सत्य

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी
2

गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी डिकॉय ऑपरेशन! ९९ टक्क्यांहून अधिक सोनोग्राफी केंद्राची तपासणी

Menopause म्हणजे काय? मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, राहाल कायमच आनंदी
3

Menopause म्हणजे काय? मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या काळजी, राहाल कायमच आनंदी

Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती
4

Precision Onco-Hematology जीव वाचवण्यासाठी आणि Caner परत येऊ नये यासाठी खास वैयक्तिक उपचार पद्धती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.