Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशी जाण्याची इच्छा आहे? जाणून घ्या असे देश जिथे निवासी बनण्यासाठी दिले जातात पैसे आणि जमीन…

Countries Special Offer : फक्त परदेशी फिरु नका तर तिथे निवासीही व्हा. जपान, स्पेनसारखे अनेक देश लोकांना आपल्या देशात निवासी करुन घेण्यासाठी पैसे, घर आणि अनेक सोयीसुविधा देऊ करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 08:54 AM
परदेशी जाण्याची इच्छा आहे? जाणून घ्या असे देश जिथे निवासी बनण्यासाठी दिले जातात पैसे आणि जमीन...

परदेशी जाण्याची इच्छा आहे? जाणून घ्या असे देश जिथे निवासी बनण्यासाठी दिले जातात पैसे आणि जमीन...

Follow Us
Follow Us:
  • काही देश लोकसंख्या वाढवण्यासाठी परदेशी लोकांना खास सुविधा आणि आर्थिक मदत देत आहेत.
  • या संधीमध्ये नोकरी, स्वस्त घर किंवा इतर फायदे मिळू शकतात, पण काही अटीही लागू असतात.
  • योग्य माहिती आणि तयारी केल्यास अशा ऑफर्सचा फायदा घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करता येऊ शकते.
आयुष्यात एकदा तरी परदेशी फिरुन यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवा देश, नवीन लोक, वेगळी लाईफस्टाईल हे सर्वच आपल्याला लगेच आकर्षित करतं. बऱ्याच भारतीयांच बजेट जुळत नसल्याने परदेशी जाण्याचं त्यांच स्वप्न हे स्वप्नच बनून राहतं. पण विचार करा जर तुम्हाला दुसरा देश तिथे राहण्याचे पैसे आणि जमिन फ्रिमध्ये देत असेल तर तुम्ही काय निर्णय घ्याल? आम्ही तुम्हाला सांगतो की, जगात असे काही देश आहेत जे तुम्हाला स्वत:हून त्यांच्या देशात राहण्यासाठी खास ऑफर देत आहेत. या देशांची स्थानिक लोकसंख्या वाढावी यासाठी इथे रहिवाशी होत असलेल्या लोकांना आर्थिक मदत, स्वस्त जमीन, कर सवलती आणि इतर फायदे दिले जातात. तथापि यात काही अटींचाही समावेश असतो ज्यामुळे अचूक माहिती आणि योग्य वेळ साधणे महत्त्वाचे ठरते. चला कोणकोणते देश ही सुवर्णसंधी देत आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.

देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली

कॅनडा

कॅनडा हा देश स्थलांतरीत लोकांसाठी फार पूर्वीपासून ओळखला जात आहे. अशात देश आता तेथील लहान देशांंमध्ये वस्ती करण्यावर अधिक भर देत आहे. यासाठी देश ‘रुरल अँड नॉर्दर्न इमिग्रेशन पायलट’ (RNIP) सारखे नवे उपक्रम राबवत आहे. याचा मूळ उद्देश म्हणजे मोठ्या शहरांऐवजी लहान शहरांमध्ये वसाहत वाढवणे. या योजनेइअंतर्गत, जर कोणत्या परदेशी व्यक्तीला तिथे नोकरी मिळाली तर त्याला कायमस्वरुपी तिथे निवास करण्यासाठी संधी दिली जाईल. अनेक भारतीयांनी या संधीचा फायदा घेतला असून विशेषत: आयटी आणि आरोग्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी याचा जास्त फायदा करुन घेतला आहे. तथापि हा एक पायलट प्रकल्प होता ज्यात काळानुसार बदल करण्यात आले होते.

इटली

इटलीमध्ये काही गावांची संख्या वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत तेथील लोकसंख्या वाढवणे हे सरकारचे मूळ उद्देश बनले आहे. सरकार इथे स्थानिक होण्यासाठी लोकांना पैसे देखील देऊ करत आहे. प्रेसिच आणि सांबुकासारख्या गावांमध्ये घर खरेदी करण्यासाठी आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी २५,००० युरोपर्यंतची मदत केली जाते. पण यात एक प्रमुख अट अशी आहे की तुम्हाला निश्चित वेळेत घर खरेदी करुन त्याची दुरुस्तीही करावी लागेल. युरोपमध्ये तुम्हाला कमी खर्चात घर तर घेता येईल पण ग्रामीण भागात राहताना तेथील जीवनशैलीचाही भाग व्हावं लागेल जे प्रत्येकाला जमेलं की नाही ते सांगता येत नाही.

जपान

तंत्रज्ञानाने प्रगत जपान देशातही लोकसंख्या झपाट्याने कमी होत चालली आहे विशेषत: ग्रामीण भागात. परिणामी, ‘अकिया’ म्हणजेच रिकाम्या घरांची संख्या वाढत आहे. अशात सरकार आता ही घरे फार कमी किमतीत किंवा विनामूल्य देऊ करत आहे. काही भागांमध्ये स्थायिक झाल्यास आर्थिक मदतही मिळू शकते. परंतु इथे राहणे फारसे सोपे नाही आणि भाषित बदलांमुळे तुम्हाला इथे राहण्यासाठी प्रथम इथली भाषा शिकावी लागेल, ग्रामीण वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. इथे रोजगाराच्या संधी मर्यादित असतात. पण साधे आणि शांत जीवन जगायचे असल्यास तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.

गर्दीपासून दूर करा गोकर्णाची सफर, मंदिर- बीच-शांतता… इथे घेता येईल सर्वांचाच आनंद

जर्मनी

जर्मनीत तुम्ही नोकरीला लागलात तर तुम्हाला काही खास सोयीसुविधा मिळू शकतात. ईयू ब्लू कार्डसारख्या योजनांद्वारे कुशल कामगारांना आमंत्रित केले जाते. तुमची पात्रता असल्यास किंवा तुमच्याकडे जाॅब असल्यास तुम्हाला इथे चांगला पगार, मोफत किंवा कमी खर्चात शिक्षण आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्या सेवा पुरवल्या जातील. अनेक भारतीय इंजिनियर आणि डाॅक्टर फार काळापासून इथे काम आणि निवास करत आहेत.

स्पेन

स्पेनमधील पोंगासारखी काही लहान गावे नवीन लोकांना इथे स्थायिक होण्यासाठी आर्थिक मदत देऊ पाहतात. इथे स्थायिक होण्यासाठी तुम्हाला ३,००० युरोपर्यंत मुद्दल दिली जाऊ शकते. जर तुम्हाला मुले असतील तर अतिरिक्त बोनस देखील देण्यात येतो. पण या ऑफर्स दरवर्षी येत नाहीत तर खूप मर्यादित वेळेपर्यंत त्या असतात. जर तुम्ही अशा संधीच्या शोधात असाल, तर अद्ययावत माहिती घेत राहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Countries offering money housing incentives to attract foreigners live and settle abroad opportunities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Canada
  • Italy
  • Japan
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
1

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
2

Travel News : उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव
3

बाजूला सारा गोवा, यंदा भेट द्या रत्नागिरीला भेट… बीच, किल्ले ते रानमेव्यापर्यंत इथे मिळेल अनेक गोष्टींचा अनुभव

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!
4

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.