फोटो सौजन्य: Freepik
उन्हाळ्यात आपल्याला नेहमी सांगितले जाते की पाणी जास्तीत जास्त प्यावे. याचे कारण म्हणजे उन्हाळयात शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे. पण फक्त उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यात सुद्धा तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. पावसाळ्यात आपल्या आजूबाजूचे वातावर थंडगार झाल्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. याचाच परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपल्याला वाटते की शरीराला पाण्याची गरज नाही परंतु तसे नसते.
कमी पाणी प्यायल्याने फक्त शरीरातील पचनशक्ती कमकुवत होत नाही तर शरीरातील पोषक तत्वे सुद्धा योग्य प्रकारे शोषली जात नाहीत. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा पाच ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी तर वाढवेलच पण तुम्हाला निरोगी सुद्धा ठेवेल.
पावसाळ्याच्या दिवसात हायड्रेटेड राहण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात लिंबू आणि आल्यापासून बनवलेले पेय समाविष्ट करू शकता. हे करण्यासाठी तुम्हाला लिंबू, पुदिन्याची पाने आणि आल्याचे छोटे तुकडे ठेचून पाण्यात मिसळून प्यावे लागेल.
दालचिनी आणि आल्यापासून बनवलेले पेय देखील तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवू शकते. हे पेय प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढेलच, पण तुम्ही डिहायड्रेशन सुद्धा टाळू शकता. हे पेय तयार करण्यासाठी, आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या. यानंतर एक चमचा दालचिनी पावडर घालून पाण्यात मिसळा व त्यानांतर ते पिऊन टाका.
पावसाळ्याच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी सफरचंद, लवंग आणि दालचिनीचे पेय देखील खूप प्रभावी आहे. हे पेय तयार करण्यासाठी, पहिले एक किंवा दोन ग्लास पाणी गरम करा. यानंतर सफरचंद, दालचिनी आणि लवंगाचे छोटे तुकडे टाकून त्याचे सेवन करा. हे पेय तुमच्या पचनसंस्थेसाठी तर चांगले आहेच पण याच्या मदतीने तुम्ही हायड्रेट सुद्धा राहू शकतात.
स्ट्रॉबेरी आणि तुळशीचे पेयही पावसाळ्यात चांगले असते. हे प्यायल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ होते. हे पेय तयार करण्यासाठी, तुम्हाला 3-4 स्ट्रॉबेरी आणि काही तुळशीची पाने कुस्करून एक किंवा दोन ग्लास पाण्यात घालावी लागतील. यानंतर, काही वेळाने हे मिश्रण तसेच राहू द्या व नंतर सेवन करा.
लिंबू आणि पुदिन्याचे पेय देखील शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. हे पेय तयार करण्यासाठी 5-6 पुदिन्याची पाने, 4-5 काकडीचे तुकडे आणि 1 चमचा लिंबाचा रस, एक किंवा दोन ग्लास पाण्यात मिसळा. यानंतर त्याचे सेवन करा.