Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी, त्वचा राहील कायमच सुंदर

झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे रक्तात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे त्वचा अतिशय सुंदर राहते.याशिवाय मूळव्याध, सर्दी खोकला इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही झेंडूच्या फुलांचा चहा पिऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 17, 2025 | 11:53 AM
रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या वाढू लागतात. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव,सतत जंक फूडचे सेवन, अपचन इत्यादीमुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे लिव्हर, किडनी आणि रक्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाणे आवश्यक आहे. रक्तात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे शरीराला अनेक गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नेहमीच शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला रक्तातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या फुलांचा चहा नियमित प्यावा? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फुलांचा चहा आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवून देईल.(फोटो सौजन्य – istock)

रक्तात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी ‘या’ वेळी खा केळी,रक्तवाहिन्यांमधील अडथळे होतील दूर

सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले उपलब्ध असतात. झेंडूच्या फुलांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय झेंडूची फुल आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी ठरतात.ही फुले आधिककाळ व्यवस्थित टिकून राहतात. झेंडूची फुले लवकर खराब होत नाहीत. झेंडूच्या फुलांचा वास काहींना आवडत नाही. पण ही फुले आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी ठरतात. झेंडूच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करून त्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या झेंडूच्या पाकळ्या टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले पाणी गाळून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या फुलांचा वापर करावा.

झेंडूच्या फुलांचा चहा पिण्याचे फायदे:

त्वचा स्वच्छ होते:

वारंवार आहारात तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे अपचनाची समस्या कायमच उद्भवते. अशावेळी झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचेवर चमकदार ग्लो येतो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, पुरळ, खाज आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी झेंडूची फुले प्रभावी ठरतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेचा हानिकारक पेशींपासून बचाव करतात.

रक्त शुद्ध होते:

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात चांगले आणि योग्य प्रमाणात रक्त असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण रक्त खराब झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे झेंडूच्या चहाचे सेवन करावे. यामुळे चेहऱ्यावर येणारे फोड आणि मुरूम लवकर बरे होतात. याशिवाय साथीच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी झेंडूच्या चहाचे सेवन करावे.

शरीरात वारंवार थकवा जाणवतो? Vitamin B-12 वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ डाळीचा समावेश, रक्त वाढण्यास होईल मदत

वेदना आणि सूज:

झेंडूच्या फुलांमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीराच्या कोणत्याही अवयवाला आलेली सूज कमी होते. याशिवाय दातदुखी, सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी झेंडूच्या फुलांचा चहा प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Detox your blood naturally with this yellow flower tea keeps skin healthy and glowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • glowing face
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
1

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
2

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे
3

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.