रक्तात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी 'या' वेळी खा केळी
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, चुकीच्या वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. त्यामुळे कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीराची काळजी घ्यावी. बऱ्याचदा तिखट, मसालेदार, अतितेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात घाणेरडे कोलेस्ट्रॉल साचून राहण्यास सुरुवात होते. शरीरात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यानंतर रक्त प्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे काहीवेळा अचानक छातीमध्ये दुखणे, दम लागणे किंवा रक्तदाब वाढणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयासाठी अतिशय धोकादायक ठरते. कारण यामुळे कोणत्याही हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित एक किंवा दोन केळी खावी. केळी खाल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. जाणून घ्या केळी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सकाळी ११ वाजता केळी खावीत. कारण यावेळेत शरीराची ऊर्जा काहीशी कमी होऊन जाते आणि गोड, तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे ११ वाजता केळी खाल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. केळी खाल्यामुळे शरीरातील ऊर्जा दीर्घकाळ टिकून राहते आणि अनावश्यक पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.
शरीरात वाढलेला उच्च आणि कमी रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतो. यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात नियमित केळी खावी. केळ्यांमध्ये असलेले पोटॅशियम रक्तवाहिन्या रिलॅक्स करण्यासाठी मदत करते आणि रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होऊन जातो. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित १ किंवा २ केळी खावीत.
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या जंतांमुळे १८ जणांचा मृत्यू, वेगाने पसरतोय ‘हा’ आजार, लक्षणे काय आहेत?
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. बिस्किट, केक किंवा चॉकलेट इत्यादी पदार्थांचे सेवन करण्याऐवजी केळी खावीत.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय?
शरीरातील पेशींच्या पडद्याचा भाग बनवण्यासाठी आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार होते आणि काही पदार्थांमधूनही ते शरीरात येते.
कोलेस्टेरॉलचे प्रकार:
रक्तातील LDL ची उच्च पातळी धमन्यांमध्ये प्लेक तयार करून हृदयाच्या समस्या वाढवते. उच्च HDL पातळी हृदयविकाराचा धोका कमी करते.
कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करावे?
भरपूर फळे आणि भाज्या खा.संपूर्ण धान्य, शेंगदाणे आणि फायबरयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करा.अस्वास्थ्यकर चरबी, मीठ आणि साखर यांचे सेवन कमी करा.वनस्पती स्टॅनॉल आणि स्टेरॉल असलेले पदार्थ खा, कारण ते कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात.