डायबिटीसवर बाबा रामदेव यांचे रामबाण उपाय (फोटो सौजन्य - iStock)
भारतामध्ये आता इतके डायबिटीस रूग्ण वाढले आहेत की, भारताला आता मधुमेहाची राजधानी म्हटले जात आहे. सध्या आपल्याकडे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. भारतात १० कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. जगातील प्रत्येक सहावा मधुमेहाचा रुग्ण भारतातील आहे. बहुतेक प्रकरणे टाइप-२ मधुमेहाची आहेत, जी जीवनशैलीशी संबंधित आहे. मधुमेह हा असा आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखर वाढते. याचे कारण एकतर शरीरात इन्सुलिन नावाच्या हार्मोनची कमतरता असते किंवा इन्सुलिन योग्यरित्या काम करत नाही. इन्सुलिन शरीरातील साखर नियंत्रित करते.
मधुमेह हा एक सायलंट किलर असून असाध्य आजार आहे, जो हळूहळू शरीराच्या सर्व अवयवांना नुकसान पोहोचवतो. बहुतेक रुग्णांना साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. जर तुम्हाला औषधांशिवाय मधुमेह नियंत्रित करायचा असेल, तर बाबा रामदेव यांनी यासाठी दोन सोपे उपाय सुचवले आहेत, जे तुम्ही YouTube वर पाहू शकता (फोटो सौजन्य – iStock/Instagram)
डायबिटीससाठी आक
डायबिटीसवरील उत्तम घरगुती उपाय
बाबा रामदेव म्हणाले की हा उपाय इतका प्रभावी आहे की अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. काही रुग्ण असे आहेत ज्यांची साखरेची पातळी पूर्वी ४०० किंवा ५०० च्या वर असायची. हा उपाय वापरल्यानंतर त्यांची साखरेची पातळी १०० पर्यंत खाली आली. यासाठी त्यांनी नक्की काय करायचे याबाबतही व्हिडिओमध्ये सांगितले आहे
5 चुकांमुळे डायबिटीसची शुगर पार करेल 300 चा आकडा, औषधंही येणार नाहीत कामी; 5 पद्धतीने आणा नियंत्रणात
दुसरा उपाय गारमुंडा फळ
डायबिटीससाठी करा गारमुंड फळाचा वापर
बाबा रामदेव यांनी साखरेवर नियंत्रण ठेवण्याचा आणखी एक सोपा मार्ग सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही इंद्रायण कारला किंवा गरमुंडा फळ वापरू शकता. हे फळ सहसा राजस्थानमध्ये आढळते. ते वापरण्यासाठी तुम्ही ते पायाखाली तुडवू शकता. असे केल्याने मधुमेह बरा होऊ शकतो.
बाबा रामदेव म्हणाले की, हे आयुर्वेदिक उपाय केवळ साखर कमी करत नाहीत तर तुम्ही कावीळवरदेखील त्यांचा वापर करू शकता. रामदेव बाबांच्या म्हणण्यानुसार, कावीळ आणि संधिवात बरा करण्यासाठी हा एक चांगला आणि सोपा उपाय आहे.
रामदेव म्हणाले की, राजस्थानमध्ये आढळणारे हे फळ आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. ज्या लोकांना यकृत किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांनी हे फळ पायांनी तुडवून या समस्यांपासून आराम मिळवू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.