Protein Side Effects On Health
स्नायू मजबूत करण्यासाठी, टिश्यूस रिकव्हरीसाठी आणि शरीराची सामान्य कार्ये सुरुळीत चालू ठेवण्यासाठी प्रोटीन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. खरं तर, प्रत्येक व्यक्तीला त्याते वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्य यानुसार प्रोटीनची गरज बदलते. परंतु तुम्हाला माहित आहे का जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
प्रोटीन हे शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे पोषक तत्व आहे. परंतु त्याच्या मेटाबॉलिजममधून नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात. जे शरीरातून बाहेर टाकण्यात किडनीची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त प्रथिने सेवन करते, तेव्हा किडनीमधील रक्तप्रवाह आणि फिल्टररेशन प्रक्रिया वाढू शकते. याला ग्लोमेरुलर हायपरफिल्ट्रेशन म्हणतात.
ज्या लोकांना आधीपासूनच किडनीचा आजार आहे, त्यांनी गरजेपेक्षा जास्त प्रोटीनचे सेवन केल्यास स्थिती बिघडू शकते. अशा व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीनचे सेवन करावे.
प्रोटीनच्या पचनेच्या प्रक्रियेनंतर युरिया तयार होतो, ज्याला किडवी फिल्टर करुन लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात. अतिरिक्त प्रोटीन खाल्ल्यास युरियाचे उत्पादन देखील वाढू शकते. परंतु, केवळ युरिया वाढणे हे किडनी खराब झाल्याचा पुरावा नाही.
हाय प्रोटीनयुक्त आहारात शरीराला पुरेसे पाणी पुरवणे महत्त्वाचे आहे. प्रथिनांच्या मेटबॉलिडममधून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीर सामान्यतः हायड्रेटेड ठेवले पाहिजे. परंतु, केवळ जास्त प्रोटीन खाल्ल्याने प्रत्येक व्यक्तीचे डिहायड्रेशन होईलच असे नाही.
जर एखादी व्यक्ती फक्त प्रोटीनवर लक्ष केंद्रित करत असेल आणि फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबरकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याचा आहार असंतुलित होऊ शकतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पोषणविषयक समस्या उद्भवू शकतात.
प्रोटीनची गरज प्रत्येकासाठी वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्यावर अवलंबून असते. साधारणपणे, एका निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम सुमारे ०.८ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांना १.२ ते १.६ ग्रॅम, आणि स्नायू तयार करणाऱ्या खेळाडूंना शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम १.४ ते २ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असू शकते.
Ans: अतिप्रमाण प्रोटीन खाल्ल्याने किडनीवरील ताण वाढू शकतो.
Ans: निरोगी प्रौढ व्यक्तीला प्रति किलो वजनामागे साधारण 0.8 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते.
Ans: अति सेवनामुळे पचनाच्या समस्या आणि आहारातील असंतुलन होऊ शकते.






