Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह निदान झाले आहे… पुढे काय केले पाहिजे, रूग्णाच्या प्रश्नावर तज्ज्ञांचा खुलासा

कॅन्सर हा गंभीर आजार असून हल्ली अनेकांमध्ये दिसून येत आहे. हा आजार झाल्यानंतर मानसिकांनी शारीरिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. महिलांना प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सरला सामोरे जावे लागत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2024 | 03:22 PM
मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन

Follow Us
Close
Follow Us:

भारतात, स्‍तनाचा कर्करोग हा सर्वात निदान होणारा कर्करोग आहे. आपल्‍यापैकी बहुतेकजण अशा व्‍यक्‍तींना ओळखतात, ज्‍यांनी स्‍तनाचा कर्करोगाविरोधातील आव्‍हानात्‍मक संघर्षाचा सामना केला आहे. कुटुंबातील सदस्‍य, मित्रमैत्रिण किंवा सहकारी असो, त्‍यांचे अनुभव या आजाराच्‍या घातक वास्‍तविकतेची जाणीव करून देतात. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचा सामना केलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या प्रवासामधून जीवन, कुटुंब व समुदायांवर या आजाराच्‍या परिणामाची आठवण होते, ज्‍यामुळे या आजाराबाबत जागरूकता व पाठिंब्‍याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने दिसून येते.

सह्याद्री हॉस्पिटल्‍सच्‍या मेडिकल ऑन्‍कोलॉजीचे कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. तुषार पाटील म्‍हणाले, “वर्षानुवर्षे मी निरीक्षण केले आहे की, जवळपास 30 टक्‍के रूग्‍ण मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या लक्षणांबाबत समज व गैरसमजांना बळी पडतात. रूग्‍ण व केअरगिव्‍हर्सनी उपचार पर्याय व निष्‍पत्तींबाबत अर्थपूर्ण संवाद साधणे, तसेच मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसह जगण्‍याच्‍या गुंतागुंतींमधून नेव्हिगेट करणे महत्त्वाचे आहे. केमोथेरपीपासून प्रगत उपचार पर्यायांपर्यंत जोखीम घटक आणि मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरच्‍या व्‍यवस्‍थापनामधील अद्वितीय आव्‍हानांबाबत माहित असले पाहिजे. रूग्‍णांनी अचूक माहितीसह स्‍वत:ला खंबीर केले पाहिजे आणि योग्‍य उपचार योजनेची निवड केली पाहिजे, जी त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा व जीव वाचण्‍याची शक्‍यता सुधारेल. मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरबाबत पाच समज आहेत.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: स्ट्रोकच्या रुग्णांसाठी आधुनिक उपचारांचे वरदान, कोणते आहेत पर्याय

खाली काही टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यास मदत करू शकतात:

निदानाबाबत जाणून घ्‍या:

आजाराबाबत अधिक उत्तमपणे जाणून घेण्‍यासाठी हेल्‍थकेअर टीमसोबत खुल्‍या मनाने सल्‍लामसलत करा, शंका विचारा. प्रगत थेरपीजसह सर्व उपचार पर्यायांचा शोध घ्‍या आणि संभाव्‍य प्रति‍कूल परिणामांबाबत जाणून घ्‍या.

सर्वोत्तम उपचाराची निवड करा:

मेटास्‍टॅटिक ब्रेस्‍ट कॅन्‍सरसाठी प्रत्‍येक थेरपी उपचाराचे स्‍वत:चे प्रतिकूल परिणाम असतात. पण, लक्ष्यित थेरपीज व इम्‍यूनोथेरपीसह उपचार पर्यायांमध्‍ये सुधारणा होण्‍यासह रूग्‍णांना अधिक पर्याय उपलब्‍ध आहेत. तुमच्‍यासाठी योग्‍य असलेल्‍या उपचार पर्यायांबाबत डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

सपोर्ट सिस्‍टम तयार करा:

जिवलग कुटुंबिय व मित्रांना निदानाबाबत सांगा, कारण त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळे तुम्‍हाला उपचार प्रवासादरम्‍यान स्थिरता निर्माण होण्‍यास मदत होईल. तसेच, अशाच आव्‍हानांचा सामना करत असलेल्‍या इतर व्‍यक्‍तींशी कनेक्‍ट होण्‍याकरिता स्‍थानिक सपोर्ट ग्रुप्‍स किंवा ऑनलाइन समुदायांमध्‍ये सामील व्‍हा. अनुभवांची देवाणघेवाण केल्‍याने बहुमूल्‍य माहिती मिळू शकते आणि भावनिक ताण कमी होण्‍यास मदत होऊ शकते.

एकूण आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करा:

कर्करोगावरील उपचाराच्‍या प्रवासादरम्‍यान सं‍तुलित आहार, नियमित व्‍यायाम आणि पुरेशी झोप यासह आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यासाठी स्‍वत:ची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. चिंतन किंवा योग यासारख्‍या तणाव दूर करणाऱ्या तंत्रांचा अवलंब करा आणि आरामदायीपणा व उत्‍साह देणारे क्रियाकलाप करण्‍यासाठी वेळ काढा, ज्‍यामुळे भावनिक व शारीरिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम राहण्‍यास मदत होईल.

हे देखील वाचा: समुद्राच्या खारट पाण्याचं रहस्य माहीत आहे का? समुद्रात एवढं मीठ येतं कुठून? जाणून घ्या

आर्थिक नियोजन:

उपचारासाठी होणारा खर्च जाणून घेण्‍यासोबत आर्थिक सहाय्यक पर्यायांचा शोध घेण्‍यासाठी डॉक्‍टर्स व विमा प्रदात्‍यांसोबत सल्‍लामसलत करा. तसेच, परिवहन ते अपॉइण्‍ट्समेंट्स, चाइल्‍डकेअर गरजा आणि कामाच्‍या स्थितीनुसार कोणतेही आवश्‍यक समायोजन अशा व्‍यावहारिक घटकांचा विचार करा.

Web Title: Diagnosed with metastatic breast cancer expert clarification on patients question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • Breast Cancer
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
1

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान
2

घरातील झुरळांना चुकीच्या पद्धतीने मारताय? आरोग्यासंबंधित वाढेल ‘या’ आजारांचा धोका, शरीराचे होईल नुकसान

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य
3

पचनसंस्था कायमच राहील निरोगी! ‘हे’ सोपे नियम फॉलो करून मिळवा पोटाच्या विकारांपासून कायमची सुटका, सुधारेल आरोग्य

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
4

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.