Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका, वेळीच व्हा सावध

सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळणारे पॅराबेन्स, फ्थॅलेट्स आणि बेंझीन यांसारख्या घटकांमुळे त्वचेला हानी पोहचते. महागडे प्रॉडक्ट लावल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो पण कालांतराने त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2025 | 11:20 AM
कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका

कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्समधील केमिकल्समुळे वाढतोय त्वचा कर्करोगाचा धोका

Follow Us
Close
Follow Us:
  • त्वचेचा कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
  • महागड्या क्रीमचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?
  • सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळून येणाऱ्या कोणत्या घटकांमुळे त्वचेला हानी पोहचते?
सातारा – त्वचा सुंदर दिसावी, सुगंध टिकावा आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी अनेकजण दररोज विविध कॉस्मेटिक्स, क्रीम्स आणि डिओड्रंट्सचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांमध्ये असलेल्या हानिकारक रसायनांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. हानीकार केमिकल असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष दिल्यास गंभीर आजारापासून सुटका मिळवता येईल. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही महागड्या स्किन केअरचा किंवा क्रीमचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन १० रुपयांच्या ‘या’ पदार्थांने होईल गायब, साइड इफेक्ट न देणारा सोपा घरगुती उपाय

अलीकडील अभ्यासानुसार, सौंदर्यप्रसाधनांमध्ये आढळणारे पॅराबेन्स, फ्थॅलेट्स, ट्रायक्लोसन, फॉर्मल्डिहाइड आणि बेंझीन यांसारखे केमिकल्स त्वचेवाटे शरीरात प्रवेश करतात आणि दीर्घकाळात हार्मोन्सचे संतुलन बिघडवून स्तन, त्वचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. मस्कारा आणि आयलाइनरमध्ये आढळणारे कार्बन ब्लॅक हे घटक कर्करोगाशी संबंधित असू शकतात.केसांच्या रंगांमधील रसायने थेट त्वचेच्या संपर्कात येतात किंवा केल रंगवण्याच्या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या धुरात श्वास घेतल्याने किंवा सतत त्याच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नियमित वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंट्स आणि लोशन्समधील सुगंधी घटक शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनसारखे कार्य करतात, ज्यामुळे पेशींच्या अनियमित वाढीचा धोका वाढतो.केमिकल-फ्री, पॅराबेन-फ्री किंवा नॅचरल अशा प्रकारची लेबल्स असलेली उत्पादनं वापरण्याचा प्रयत्न करा.नैसर्गिक पर्याय जसे की कोरफडीचा गर, नारळाचे तेल, बेकिंग सोडा किंवा लिंबूवर्गीय अशा सुगंधी तेलांपासून बनवलेले डिओड्रंट्स अधिक सुरक्षित ठरू शकतात.चांगल्या आरोग्यासाठी सुंदरतेसोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ॲान्कोलॅाजिस्ट डॅा. अमोल पवार यांनी स्पष्ट केले.

सौंदर्य प्रसाधनांचा वापर पूर्णपणे टाळणे शक्य नाही. परंतु योग्य माहिती, त्यातील घटकांची तपासणी आणि सुरक्षित पर्यायांची निवड केल्यास रसायनांमुळे होणारा संभाव्य कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो. त्वचा सुंदर राहण्यासाठी नुसती केमिकल्सचा वापर न करता सुरक्षितता आणि जागरूकता पसरविणे गरजेचे आहे.

शार्प जो लाईन हवीये? हा व्यायाम करत चला, मिळवाल हवा तसा लुक

त्वचेच्या कॅन्सरची शरीरात दिसून येणारी लक्षणे:

  • कोणत्याही अवयवावर नवीन डाग किंवा तीळ तयार होणे.
  • जुन्या तीळचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलणे.
  • त्वचेवर खाज येणे, रक्तस्त्राव होणे किंवा जखम न भरणे.
  • खासकरून मानेच्या दोन्ही बाजूस किंवा कानाजवळ गाठ येणे, जी २-३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्वचेच्या कर्करोगाची कारणे?

    Ans: सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहणे किंवा टॅनिंग बेडचा वापर केल्याने धोका वाढतो.

  • Que: त्वचेच्या कर्करोगाचे मुख्य प्रकार?

    Ans: मेलेनोमा, बेसल सेल आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा.

  • Que: स्किन कॅन्सरची लक्षणे?

    Ans: त्वचेवर नवीन डाग किंवा तीळ तयार होणे. जुन्या तीळचा आकार, रंग किंवा स्वरूप बदलणे.

Web Title: Chemicals in cosmetics creams and deodorants increase the risk of skin cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 11:20 AM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • Skin disease

संबंधित बातम्या

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम
1

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक
2

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका
3

घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी धूप अगरबत्ती लावताय! अगरबत्तीमुळे उद्भवू शकतो कॅन्सरसारख्या ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
4

वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.