तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी
Diwali 2026: दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे अनेक प्रकार बनवले जातात. मिठाई, दिवाळीचा फराळ, याशिवाय विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. दिवाळीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी विकतची मिठाई आणली जाते. पण सणावारांच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरातील साहित्याचा वापर करून झटपट बेसन बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट होणारी बर्फी खाल्ल्यानंतर सगळेच तुमचं कौतुक करतील. बेसन बर्फी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Easy Milk Peda Recipe: बाजारातील महागडे पेढे नकोत! कमी साहित्यात घरीच बनवा स्वादिष्ट दूध पेढे






