
दिवाळीनिमित्त भाजणीशिवाय बनवा इन्स्टंट तयार होणारी कुरकुरीत बटर चकली, नोट करून घ्या रेसिपी
Diwali 2026: दिवाळीनिमित्त घरात फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. फराळाच्या पदार्थांमध्ये आवर्जून चकली बनवली जाते. कुरकुरीत चकलीशिवाय फराळाचे ताट पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. चकली बनवताना प्रामुख्याने वेगवेगळ्या डाळींची भाजणी तयार केली जाते. पण भाजणी बनवताना झालेला चुकांमुळे पदार्थाची चव पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भाजणीचा वापर न करता कुरकुरीत चकली भाजणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली बटर चकली चवीला अतिशय सुंदर लागते आणि सगळेच तुमचं कौतुक करतील. भाजणी बनवण्याचा अनेकांना खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी या पद्धतीने चकल्या बनवाव्यात. बटर चकली कमी वेळात झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)