नानकटाई बनवल्यानंतर दगडासारखी कडक होऊन जाते? मग या पद्धतीने घरी बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई
Diwali 2026: दिवाळीच्या फराळातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे नानकटाई. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नानकटाई खायला खूप जास्त आवडते. पण नानकटाई बनवताना केलेल्या छोट्या मोठ्या चुका पदार्थाची चव खराब करून टाकतात. त्यामुळे नानकटाई बनवताना योग्य त्या टिप्स फॉलो करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला बेकरीस्टाईल नानकटाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली नानकटाई अजिबात कडक किंवा दगडासारखी होणार नाही. दिवाळीच्या फराळात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, पण ते पदार्थ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धत वापरून न केल्यास अजिबात टेस्ट लागत नाही. चला तर जाणून घेऊया बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Diwali Sweets: ५ मिनिटांमध्ये बनवा केशर कोकोनट लाडू, दिवाळीतील फराळाची वाढेल रंगतदार चव






