भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा
दिवाळीमध्ये येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्व आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज हे सण साजरा केला जातो. सणाच्या दिवशी घरात फराळ आणि मिठाईतील पदार्थ विकत आणले जातात. पण सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाई बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये इन्स्टंट पेढा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरात कोणत्याही सणाच्या दिवशी पेढे आवर्जून आणले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे बाजारातील विकतची मिठाई आणण्यापेक्षा घरी बनवलेली मिठाई खावी. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पेढा हा पारंपरिक पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया कमीत कमी साहित्यात इन्स्टंट पेढा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा ‘नारळाची गोडसर रबडी’