Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण

गोड आणि रसाळ फणस खायला सगळ्यांचं खूप आवडतो. मात्र फणस खाल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पोटातील आतड्यांवर ताण येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2025 | 08:48 AM
फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन

फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात आंबे, फणस, काजू इत्यादी अनेक फळे उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे फणस. चवीला गोड आणि रसाळ फणस सगळ्यांचं खायला खूप आवडतो. फणसाचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कापा फणस, दुसरा रसाळ फणस. पण आवडीने खाल्ला जाणारा फणस चुकीच्या पद्धतीने खाल्यास शरीराच्या पचनक्रियावर गंभीर परिणाम करतो. यामुळे अपचन, गॅस, मळमळ इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बऱ्याचदा घरातील वडीलधारे व्यक्ती फणस खाल्यानंतर पाणी पिऊ नये, असा सल्ला देतात. फणस खाल्यानंतर शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते. याशिवाय काहींना लघवीमध्ये जळजळ वाढणे, आतड्यांवर ताण येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फणस खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचे सेवन, नसांमधील घाण होईल स्वच्छ

दही किंवा ताक:

फणस खाल्यानंतर लगेच दही, ताक किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. कारण फणसामध्ये असलेल्या उष्णतेमुळे आणि दह्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. याशिवाय यामुळे पोटात गॅस, मळमळ, जडपणा जाणवणे, सर्दी होण्याची शक्यता असते.

थंड पदार्थ:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थ, बर्फाचे पदार्थ, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण फणस खाल्यानंतर थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. थंड आणि गरम अशा दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला किंवा घशाला त्रास होण्याची शक्यता असते.

मासांहार:

फणस खाल्यानंतर चिकन, मटण, मासे इत्यादी मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे आतड्यांवर ताण येण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय अपचन, उलटी, जळजळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे फणस खाल्यानंतर कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करू नये.

Rainbow Diet म्हणजे नेमकं काय? आहारात रंगीबेरंगी फळांचे सेवन केल्यास शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

साखरयुक्त मिठाई:

फणस चवीला अतिशय गोड असतो. त्यामुळे फणस खाल्यानंतर लगेच लाडू, बर्फी, गुलाबजाम इत्यादी अतिगोड पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. मधुमेह असलेल्या रुग्णांनी फणस किंवा अतिसाखरेचे पदार्थ खाऊ नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do not accidentally consume these foods after eating jackfruit health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • jackfruit
  • side effect

संबंधित बातम्या

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
1

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
4

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.