रक्तवाहिन्यांना चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे सेवन
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चवीला गोड लागणारे पदार्थ बऱ्याचदा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. तेलकट किंवा तिखट पदार्थांचे आहारात भरपूर सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल, दुसरे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात, तर खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यास रक्तवाहिन्यांसह हृदयाच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचते. हा चिकट थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो, ज्यामुळे शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील पिवळ्या रंगाचा चिकट थर कमी होईल आणि हृद्य निरोगी राहील.
लाल रंगाचे बारीक दाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात. याशिवाय शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे डाळिंबाचा रस तुम्ही सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी सुद्धा पिऊ शकता. यामुळे नसांमध्ये अडकलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी गाजर बीटच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली सर्व घाण स्वच्छ होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. नसांमध्ये साचून राहिलेल्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे नसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.
उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी
विटामिन सी युक्त आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि फायबर शरीरातील सर्व घाण स्वच्छ करते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल. यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.