किडनी स्टोन झाल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये
धावपळीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. त्यातील वेदनादायी समस्या म्हणजे किडनी स्टोन. किडनी स्टोन झाल्यानंतर पोट दुखू वाढते. पोटामध्ये असह्य वेदना होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या रुग्णांनी योग्यरित्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पाण्याचे कमी सेवन, शरीर हायड्रेट न ठेवणे इत्यादी गोष्टींमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. किडनी स्टोन झाल्यानंतर आहारात बदल करून शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. बिया असलेले किंवा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नये. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये,याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
आपल्यातील अनेकांना मासे खायला खूप आवडत असतील. पण किडनी स्टोनची समस्या उद्भवल्यानंतर मासे खाऊ नये. आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. असे पदार्थ खाल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास आणखीन वाढण्याची शक्यता असते. प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये प्युरीन नावाचाघटक आढळून येतो,ज्यामुळे शरीरात यूरिक ॲसिडची पातळी वाढण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: रोज एक सफरचंद खाल्ल्याने खरंच आजार होत नाही का?
किडनी स्टोनची समस्या उद्भवल्यानंतर पालक भाजी खाऊ नये. पालक खाल्यामुळे स्टोन वाढू शकतो. पालक भाजीमध्ये ऑक्सलेट आढळून येते, कॅल्शियम गोळा होते आणि लघवीपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. काहींना पालक खाल्यामुळे पोट दुखीची समस्या उद्भवते.जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर पालक भाजी खाऊ नये.
किडनी स्टोनचा त्रास झाल्यानंतर शक्यतो बिया असलेले पदार्थ खाऊ नये. तसेच टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी बिया काढूनच टोमॅटोचे सेवन करावे.
किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सतत चहा पिऊ नये. सतत चहा प्यायल्यामुळे पोट दुखी वाढण्याची शक्यता असते.चहा प्यायल्यामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.
हे देखील वाचा: घशाची खवखव दूर करण्यासाठी हे 5 घरगुती उपाय
किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी सतत पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल. आहारामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, दही इत्यादी थंड आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काळे मनुके, अंजीर, प्लम इत्यादी फळे खाऊ नयेत. सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, वांगी, मशरूम आणि फ्लॉवर इत्यादी भाज्या खाणे टाळले पाहिजे. हे पदार्थ खाल्यामुळे स्टोनचा आकार वाढू शकतो.