Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

दूषित पाणी आणि अन्नपदार्थांच्या सेवनामुळे कावीळ होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 05:30 AM
शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास रक्ताचे होईल पाणी, उद्भवतील गंभीर समस्या

शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास रक्ताचे होईल पाणी, उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

कावीळ होण्याची कारणे?
कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हरचे आरोग्य कशामुळे बिघडते?

वातावरणात होणारे बदल, आहारात निर्माण झालेली पोषणाची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वारंवार जंक फूड किंवा अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. लिव्हरसबंधित अतिशय धोकादायक आजार म्हणजे कावीळ. कावीळ झाल्यानंतर लगेच शरीरात लक्षणे दिसून येत नाही. पण काही दिवसांनंतर लक्षणे अतिशय गंभीर होतात. अनेक लोक केवळ डोळे पिवळे झाले म्हणून कावीळ झाली आहे, असे समजतात. पण कावीळ झाल्यानंतर शरीरात इतरही लक्षणे दिसू लागतात, ज्याचा संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

कावीळ झाल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा जीवावर बेतू शकते. कावीळ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे हिपॅटायटिस, अस्वच्छ पाणी किंवा अन्नामुळे जंतू संसर्ग, जास्त प्रमाणात दारूचे सेवन, पित्तनलिकेत अडथळा आणि लाल रक्त पेशी वेगाने तुटल्यामुळे कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. कावीळ सारख्या गंभीर आजारावर वेळीच उपचार न केल्यास संपूर्ण शरीरात कावीळ पसरते. चला तर जाणून घेऊया कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे.

कावीळ झाल्यानंतर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

लघवीच्या रंगात बदल होणे:

कावीळ झाल्यानंतर शरीरात बिलीरुबिन नावाचा पिवळा पदार्थ झपाट्याने तयार होतो. जास्त प्रमाणात तयार झालेल्या बिलीरुबिनमुळे लाल रक्तपेशी तुटून जातात. याशिवाय पिवळा पदार्थ वेळीच बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात साचून राहतो, ज्याच्या परिणामामुळे लघवीच्या रंगात बदल दिसू लागतात. लघवीचा रंग गडद पिवळा होऊन लघवी करताना जळजळ होते.

भूक न लागणे:

कवीला झाल्यानंतर भूक कमी होऊ जाते. याशिवाय अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर मळमळ किंवा उलट्या होतात. त्यामुळे वारंवार मळमळ होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय कावीळ झाल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होतात आणि सूज आल्यासारखे वाटते. तसेच वेदना, सूज किंवा अस्वस्थता जाणवून आरोग्य बिघडून जाते.

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

डोळे आणि त्वचा पिवळी पडणे:

लघवीच्या रंगात बदल होण्यासोबतच डोळे, त्वचा आणि नख सुद्धा पिवळी होण्यास सुरुवात होते. शरीरात खूप जास्त बिलीरुबिन वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. याशिवाय कोणतेही काम न करता खूप जास्त थकवा, अशक्तपणा, धाप लागल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कावीळ झाल्याची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे, लघवीचा रंग गडद होणे, थकवा, भूक कमी होणे, मळमळ आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: कावीळ झाल्यास रक्ताचे पाणी होते का?

    Ans: ‘रक्ताचे पाणी होणे’ हा वैद्यकीयदृष्ट्या अचूक शब्द नाही. कावीळमध्ये रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. त्यामागील कारणानुसार यकृत, पित्तनलिका किंवा लाल रक्तपेशींशी संबंधित समस्या असू शकतात.

  • Que: कावीळ टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

    Ans: स्वच्छ पाणी व अन्नाचे सेवन, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित आहाराच्या सवयी आणि कावीळ निर्माण करणाऱ्या कारणांपासून बचाव करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Do not ignore these symptoms manifesting in the body jaundice leads to the breakdown of red blood cells and gives rise to serious complications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Liver

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.