Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरगुती उपाय करूनही पोट स्वच्छ होत नाही? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने

पचनक्रियेत बिघाड झाल्यानंतर काहीवेळा पोट स्वच्छ होत नाही. पोटातील विषारी पदार्थ तसेच साचून राहतात. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या शरीराला पचणाऱ्या आणि हलक्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया बिघडत नाही.कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2024 | 08:41 AM
पचनक्रिया सुधरण्यासाठी 'ही' योगासने नियमित करा

पचनक्रिया सुधरण्यासाठी 'ही' योगासने नियमित करा

Follow Us
Follow Us:

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीराची पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. काही वेळा सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे पोट बिघडून जाते. पचनक्रियेत बिघाड झाल्यानंतर काहीवेळा पोट स्वच्छ होत नाही. पोटातील विषारी पदार्थ तसेच साचून राहतात. पोटात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या शरीराला पचणाऱ्या आणि हलक्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया बिघडत नाही.कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. शरीरामध्ये शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट स्वच्छ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कधी निळ्या रंगाचं केळं पाहिलं आहे का? चव मस्त आणि फायदे जबरदस्त

पचनक्रिया सुधरण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा:

कपालभाती प्राणायाम:

सकाळी उठल्यानंतर नियमित कपालभाती प्राणायाम केल्यास शरीर आणि मन निरोगी राहील.शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतील. कपालभाती प्राणायाम करताना श्वास सोडताना पोटावर हलका दाब देऊन पोट घट्ट करा. यामुळे स्नायू सक्रिय होतील आणि आतड्यांची हालचाल वाढेल. हे प्राणायाम तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित केल्यास शरीराला अनेक पोट स्वच्छ होईल.

वज्रासन:

योगाभ्यासात वज्रासनला विशेष महत्व आहे. जेवल्यानंतर किंवा जेवल्यानंतर 10 मिनिटांनी हे आसन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. वज्रासन पचनक्रियेला चालना देण्याचे आणि कॉन्स्टिपेशनपासून आराम मिळवून देण्यास मदत करते. पोटासंबंधित समस्या दूर करण्यासाठी नियमित वज्रासन केल्यास पोट स्वच्छ होईल.

मलासन:

बिघडलेल्या पोटाच्या हालचाली सुधारण्यासाठी नियमित मलासन करावे. यामुळे शारीरिक हालचाली वाढतात आणि आरोग्य सुधारते. गुडघे टेकून बसल्यामुळे पोटावर योग्य तो ताण पडतो आणि पोटात अडकलेला वायू निघून जातो. यामुळे शारीरिक हालचाली सुधारून पोट स्वच्छ होण्यास मदत होते. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी मलासन अतिशय प्रभावी आहे.

हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय आहे? सावध व्हा! होतात अनेक दुष्परिणाम

सूर्यनमस्कार:

नियमित 10 सूर्यनमस्कार घातल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. अपचन, बिघडलेली पचनक्रिया सुधारून पोट स्वच्छ होईल. सूर्यनमस्कार घालताना संपूर्ण शरीराच्या हालचाली होतात. तसेच हा व्यायाम नियमित केल्यास आतड्यांची हालचाल वाढते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Do these yogas regularly to improve poor digestion health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
1

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
2

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
3

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
4

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.