कमकुवत झालेल्या केसांना पोषण देण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ, वयाच्या ५० व्या वर्षी होतील केस घनदाट
वाढत्या वयात केसांच्या बऱ्याच समस्या उद्भवतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. केसांसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिलांसह पुरुषसुद्धा कायमच दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे केसांच्या समस्या आणखीनच वाढू लागतात. केसांच्या समस्या उद्भवण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींची निर्माण झाल्यानंतर शरीरात हळूहळू बदल जाणवू लागतात. केस तुटल्यानंतर ते पुन्हा नव्याने उगवण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केसांमध्ये टक्कल पडल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात, या ट्रीटमेंटमुळे काहीकाळ केस अतिशय अतिशय सुंदर दिसतात. पण कालांतराने केस तुटणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमकुवत झालेल्या केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. खोबरेल तेल केसांच्या मुळांना पोषण देते. याशिवाय मागील अनेक वर्षांपासून केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जात आहे. केसांमध्ये टक्कल पडल्यानंतर हल्ली हेअर ट्रान्सप्लांट केले जाते. पण हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते.
केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलासोबतच तांदळाचे पाणी सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरते. खोबरेल तेलात तांदळाचे पाणी मिक्स करून केसांवर लावल्यास केसांच्या असंख्य समस्यांपासून सुटका मिळेल आणि केस मजबूत होतील. हे पाणी तयार करण्यासाठी वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यात पाणी घालून काहीवेळ तांदूळ भिजत ठेवा. त्यानंतर खोबरेल तेलात तांदळाचे पाणी मिक्स करून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारेल आणि केस तुटणार नाहीत. तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे केसांची कोरडी पडलेली मूळ पुन्हा एकदा मजबूत होतील. टाळूला पोषण देण्यासाठी आणि केस मजबूत ठेवण्यासाठी खोबरेल तेल केसांवर लावावे.
तांदळाच्या पाण्यासोबतच मेथी दाण्यांची पेस्ट तयार करून खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून केसांवर लावल्यास केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होईल आणि केस तुटणार नाहीत. मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणकारी घटक केस अतिशय मजबूत आणि घनदाट करण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते.






