सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग 'या' पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
बद्धकोष्ठता वाढण्याची कारणे?
एरंडेल तेलाचे सेवन कशा पद्धतीने करावे?
एरंडेल तेलाचे फायदे?
दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने व्हावी, असे सगळ्यांचं कायमच वाटत असते. पण उठल्यानंतर काहींना खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवतो तर काहीवेळा पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे जडपणा किंवा अस्वस्थपणा जाणवण्याची खूप जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे पोटात जडपणा जाणवतो आणि संपूर्ण दिवस कंटाळवाणा चिडचिडा जातो. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्यानंतर अनेक लोक एरंडेल तेलाचे सेवन करतात. एरंडेल तेलाचा वापर संपूर्ण शरीरासाठी केला जातो. केस आणि अपचनाच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या औषधांचे सेवन कारण्याऐवजी योग्य पद्धतीने एरंडेल तेलाचे सेवन करावे. पण अनेकांना एरंडेल तेलाची चव अजिबात आवडत नाही. एरंडेल तेलाचे सेवन केल्यानंतर तेल घशाशी आल्यासारखे वाटणे किंवा तेलाचा चिकटपणा तोंडात चिकटून राहिल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे एरंडेल तेलाचा सेवन करणे अनेकांना कंटाळवाणे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढत्या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
एरंडेल तेलाचे कधीही थेट सेवन करू नये. तेल खूप जास्त चिकट असल्यामुळे थेट प्यायल्यास दातांवर तेलाचा चिकट थर साचून राहाण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय एरंडेल तेल प्यायल्यानंतर अनेकांना उलट्या किंवा मळमळ होते. त्यामुळे कोमट पाणी करून त्यात एक चमचा एरंडेल तेल मिक्स करून प्यावे. यामुळे तेलाचा चिकटपणा जास्त वेळ तोंडात चिकटून राहणार नाही. एरंडेल तेल केवळ पाण्यासोबतच नाहीतर कोमट दुधासोबत सुद्धा प्यायले जाते. एरंडेल तेलाची तोंडात जास्त वेळ टिकून राहत असेल तर लवंग चघळावी. यामुळे तोंडातला चिकटपणा कमी होण्यास मदत होते.
Body Muscles: स्नायू मजबूत करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा आवर्जून समावेश करा!
एरंडेल तेलाचे सेवन केल्यानंतर ते जास्त वेळ तोंडात घेऊन राहू नये. एरंडेल तेलाचे सेवन केल्यानंतर लगेच कोमट पाणी प्यावे. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा पोटासंबंधित आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी एरंडेल तेलाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. पण वारंवार तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर केवळ एरंडेल तेलावर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. याशिवाय वारंवार एरंडेल तेलाचे सेवन केल्यास पोटात मुरडा, जुलाब, मळमळ किंवा शरीरातील पाणी कमी होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात एरंडेल तेलाचे सेवन करावे.
Ans: बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, रात्री उशिरा किंवा जड जेवण आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे सकाळी पोटात जडपणा जाणवू शकतो.
Ans: इरंडेल तेल (Castor Oil) हे उत्तेजक रेचक असून आतड्यांची हालचाल वाढवून मलप्रवृत्ती होण्यास मदत करू शकते. मात्र, ते नियमितपणे किंवा स्वतःहून घेणे योग्य नाही.
Ans: इरंडेल तेलामुळे मलविसर्जन होऊ शकते; मात्र आतड्यांमध्ये विषारी 'घाण' साचते आणि ती काढण्यासाठी नियमित क्लिन्झिंग आवश्यक असते, असे मानणे योग्य नाही.

