Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी ‘या’ पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

सणावारांच्या दिवसांमध्ये त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण त्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही फेशिअल करू शकता. चला तर जाणून घेऊया फेशिअल करण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 10:06 AM
पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी 'या' पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

पार्लरला जायचा कंटाळा येतो? मग घरच्या घरी 'या' पदार्थांचा वापर करून करा होममेड फेशिअल, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

Follow Us
Follow Us:

आजकाल महिलांसह पुरुष सुद्धा त्वचेसाठी सतत काहींना काही करत असतात. त्वचेची काळजी घेण्यावर जास्त भर दिला जातो. सोशल मीडियासह इतर अनेक ठिकाणी पाहिलेले स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण तरीसुद्धा त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. त्वचेची काळजी घेताना केवळ स्किन केअर रुटीन नाहीतर त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. त्यामुळे कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी आहारात बदल, भरपूर पाण्याचे सेवन आणि शरीरास आवश्यक असलेली पुरेशी झोप घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – istock)

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्वचेवर पिंपल्स, ऍक्ने, सुरकुत्या इत्यादी लक्षणे दिसू लागतात. चेहऱ्यावर जमा झालेल्या धुळीमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज वाटते. कायमच पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही फेशिअल करू शकता. या पद्धतीने केलेले फेशिअल त्वचेची स्वच्छता करण्यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यास मदत करेल.

क्लींजिंग:

फेशिअल करताना त्वचा स्वच्छ करणे फार आवश्यक आहे. यासाठी क्लींजिंग केले जाते. तुम्हाला सूट होणाऱ्या फेसवॉशने त्वचा स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर गुलाब पाण्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने त्वचा पुसून घ्या. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये चिकटून राहिलेली धूळ, माती स्वच्छ होण्यास मदत होईल.

एक्सफोलिएटिंग:

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी एक्सफोलिएटिंग करणे फार आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये साखर, कॉफी पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि चेहरा स्वच्छ दिसेल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

फेशियल क्रीम मसाज:

त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल क्रीम मसाज करावा. क्रीम तयार करण्यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल, बदामाचे तेल, ताज्या दुधाची साय घेऊन एकत्र मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळ क्रीम तशीच ठेवून पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर

फेस पॅक:

फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये मुलतानी माती, बेसन, चंदन पावडर, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. फेसपॅक पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर पाण्याने धुवून टाका. त्वचा पूर्णपणे कोरडी करून तुम्हाला सूट होणारे कोणतेही सीरम लावा. यामुळे त्वचेवर ग्लो येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते का?

    Ans: हो, त्वचा स्वच्छ ठेवणे, योग्य मॉइश्चरायझिंग आणि सौम्य घरगुती उपाय केल्याने त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र परिणाम प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार वेगळा असतो.

  • Que: होममेड फेशिअलसाठी कोणते पदार्थ वापरता येतात?

    Ans: त्वचेच्या प्रकारानुसार दही, मध, ओट्स किंवा बेसन यांसारखे सौम्य घटक वापरले जातात. कोणताही नवीन पदार्थ चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य.

  • Que: घरगुती फेशिअल किती वेळा करावे?

    Ans: त्वचेची संवेदनशीलता आणि वापरल्या जाणाऱ्या घटकांनुसार वारंवारता बदलते. वारंवार स्क्रबिंग किंवा एक्सफोलिएशन केल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते, त्यामुळे अतिरेक टाळावा.

Web Title: Do you dread going to the salon then try a homemade facial using these ingredients right at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका
1

पावसाळ्यात सतत खोकला होऊन छातीत कफ साचून राहतो? मग ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास कफापासून मिळेल कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
2

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग
3

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर
4

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.