
थोडंसं चालल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते? फुफ्फुस निकामी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
श्वास घेण्यास अडथळे का निर्माण होतात?
फुफ्फुसांच्या आजारांची लक्षणे?
हृदयसंबंधित आजाराची लक्षणे?
कामाच्या धावपळीमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. बऱ्याचदा थोडंसं चालल्यानंतर किंवा शारीरिक हालचाली केल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते किंवा दम लागतो. ही समस्या केवळ थकव्यामुळे नाहीतर फुफ्फुस आणि हृद्यासंबंधित आजारांमुळे उद्भवतात. शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे मेंदूची श्वास घेण्याची गती हळूहळू कमी होते. तरुण वयात किंवा वय वाढल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. हार्ट फेल्युअर, COPD, दमा किंवा अॅनिमिया यांसारख्या गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर वरील लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
शारीरिक हालचाली आणि शरीरातील इतर क्रिया व्यवस्थित होण्यासाठी ऑक्सिजनची पातळी कायमच संतुलित असणे फार आवश्यक आहे. पण ज्यामुळे हृदय पुरेसे रक्त पंप करत नाही किंवा फुफ्फुसे हवेतून पुरेसा ऑक्सिजन घेऊ शकत नाही, अशावेळी मेंदूची श्वास घेण्याची गती कमी होऊन जाते. ज्यामुळे अचानक धाप लागते. अचानक श्वास वाढणे किंवा धाप लागणे ही लक्षणे हृद्य निकामी होणे किंवा सीओपीडी सारख्या गंभीर आजारांमुळे उद्भवते. याशिवाय छातीत जडपणा किंवा पाय सुजणे इत्यादी लक्षणे हृदयाशी निगडित आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.
हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर हृदय व्यवस्थित रक्त पंप करत नाही, ज्याच्या परिणामामुळे फुफ्फुसांवर जास्तीचा तणाव येतो. शरीराच्या गरजेनुसार रक्त पंप न केल्यामुळे फुफ्फुसात पाणी साचून राहण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा चालताना छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होतो. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे कोणतेही छोटे काम करताना सुद्धा खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो.
फ्फुसांच्या लवचिकतेत किंवा वायुकोशामध्ये झालेल्या बिघाडामुळे श्वास घेण्यास खूप जास्त त्रास होतो. श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे हवा जाण्यास अडथळे निर्माण होतात. धूम्रपान किंवा प्रदूषणामुळे फुफ्फुसे कायमची कमकुवत होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. भारतासह जगभरात आलेल्या कोविड महामारीमुळे अनेकांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत.
Ans: थोडे चालल्यानंतर दम लागणे, सततचा खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा, थकवा आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे ही काही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
Ans: फुफ्फुसांचे कार्य कमी झाल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. मात्र अशा प्रकारचा थकवा हृदयविकार, रक्ताल्पता (अॅनिमिया) किंवा इतर कारणांमुळेही येऊ शकतो. त्यामुळे योग्य तपासणी आवश्यक असते.
Ans: धूम्रपान करणारे, प्रदूषणाच्या संपर्कात राहणारे, जुनाट दमा किंवा COPD असलेले, वारंवार श्वसन संसर्ग होणारे आणि काही व्यावसायिक धूळ-रसायनांच्या संपर्कात असलेले लोक अधिक धोक्यात असू शकतात.